Oplus_16908288

Oplus_16908288

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भक्तिनिवास उभारणीचा निर्णय खानापूर तालुक्यातील निडगल ग्रामस्थ व वारकरी मंडळींनी हाती घेतला आहे. पंढरपूर या ठिकाणी स्वतःची जागा खरेदी यापूर्वी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी भक्ती निवास उभारणीसाठी नुकताच ग्रामस्थ व वारकरींची बैठक झाली. यानुसार येत्या आषाढी भागवत एकादशीच्या शुभ मुहूर्तावर दि.6 जुलै रोजी दुपारी 12 वाजता या वास्तूचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन होणार आहे

या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निडगल येथील रहिवासी व मराठा मंडळ चे मुख्याध्यापक अनिल कदम हे राहणार आहेत. या कार्यक्रमाला गावातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ उद्योजक, शेतकरी व्यवसायिकांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us