खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
चापगाव येथील वारकरी संप्रदायाच्या वतीने पंढरपूर या ठिकाणी 25 वर्षांपूर्वी खरेदी स्वरूपात जागा घेऊन येथील वारकऱ्यांनी भक्ती निवास उभारणीचा संकल्प हाती घेतला होता. गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी भक्ती निवास उभारण्यासाठी वारकऱ्यांनी व अनेक देणगीदारानी यासाठी सहकार्याचा हात उभारला असून या ठिकाणी आता स्लॅबपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.
सदर स्लॅब भरणीचा कार्यक्रम मंगळवारी येथील वारकरी व काही मान्यवरांच्या उपस्थितीत हाती घेण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त सैनिक संजय बेळगावकर, ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष मारुती चोपडे, माजी उपसभापती मल्लापा मारीहाळ, म्हात्रू धबाले, शिवाजी बिर्जे, यासह वारकरी केंचाप्पा बेळगावकर, शंकर धबाले, मशनु सुतार, बाबू घार्शी, रामा धबाले, कल्लाप्पा कदम, गंगाराम यळगुकर, सागर धबाले सह अनेक वारकरी उपस्थित होते.