- बेळगाव : बेळगाव येथे आध्यात्मिक समुपदेशन शिबिराचे आयोजन ३० सप्टेंबर व एक आक्टोंबर 2023 रोजी सकाळी 9.30 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात श्री अभिमन्यूजी यांचे दर्शन व आर्शिवचन “मन स्वास्थ जेथे, रोग निवारण तेथे”असे या शिबिरा मागचा उद्देश आहे सदर शिबिर बेळगाव येथील के. पी. टी. सी. एल. समुदाय भवन, आर. एन. शेट्टी पॉलीटेक्निक कॉलेज रोड, शिवबसव नगर, बेळगावी या ठिकाणी मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
- श्री अभिमन्यूजी यांनी वैद्यकीय मानस शास्त्रातील मास्टर ऑफ फिलॉसॉफी व डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हि पदवी सम्पादन केलेली आहे. लोकांना रोगमुक्त करून त्यांना ध्यान धारणा, ज्ञान, आध्यात्म, मोक्ष व जीवन या विषयी जागृत करणे हे त्यांचे जीवन ध्येय आहे.
- लोकांनी जीवनाचे रहस्य जाणून आनंदी जीवन जगावे ही त्यांची प्रमाणिक इच्छा श्री अभिमन्यूजींना वाटते कि, मनुष्याच्या मनाची जडणघडण अशी व्हावी की एखाद्याला आपले जीवन म्हणजे एक सुख सोहळा वाटावा. म्हणूनच प्रत्येकाने आनंदी व्हावे व जीवनाचे सार जाणावे. कित्येक दशकापासून एक आध्यात्मिक समुपदेशक म्हणून काम करताना भारत व युरोपातील अनेकांना त्यांच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक समस्येवर मात करण्यासाठी ते एक आधारवड ठरलेले आहेत. याकरिता बेळगाव या ठिकाणी उद्योजक प्रसन्न घोटगे यांच्या सहकार्यातून बेळगाव येथे या आध्यात्मिक समुपदेश शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सपर्क:
९९९३३९९९४१, ८८३९९०६१६१ असे आवाहनही करण्यात आले आहे.