IMG-20231127-WA0012
  • बेळगाव : शहापूर भागातील श्री विठ्ठल मंदिराचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात आणि भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. या रथोत्सवाला साडे तीनशे वर्षांची परंपरा आहे.
  • शहापूर मधील विठ्ठल देव गल्लीतील श्री विठ्ठल मंदिर हे शहापूरचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते.देऊळकर कुटुंबियांच्या कडे मंदिराचे व्यवस्थापन आणि मालकी आहे. श्री विठ्ठल मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला प्रारंभ होतो आणि त्याची सांगता कार्तिक पौर्णिमेला होते. काकड आरतीची सांगता झाल्यावर मंदिराच्या पासून रथोत्सव सुरू झाला.विठ्ठल देव गल्ली,आचार्य गल्ली, गाडे मार्ग, दाणे गल्ली,खडे बाजार,कचेरी गल्ली, मिरापुर गल्ली आणि तेथून मंदिराकडे आल्यावर रथोत्सवाची सांगता झाली. रथोत्सवाच्या मार्गावर सडे घालून आरती करण्यात येत होती.रथोत्सवात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
  • शहापूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा आठ मजली रथ आहे.पण एवढा मोठा रथ सध्या रथोत्सवासाठी काढणे शक्य नाही. पूर्वी रथोत्सव कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येने भक्त मंडळी सहभागी होत होती, पण अलीकडे ही संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लहान रथ रथोत्सव साठी वापरला जातो. साडे तीनशे वर्षांची परंपरा या रथोत्सवाला आहे. रथोत्सव मार्गावर अनेक ठिकाणी सडे, रांगोळी घालून आरती करून श्री फळ वाढवण्यात येते.अगदी बालपणापासून मी या रथोत्सवात सहभागी होत आहे. परगावी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले लोक देखील दरवर्षी रथोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येतात अशी माहिती विठ्ठल भक्त आणि प्रसिध्द गायक नंदन हेर्लेकर यांनी दिली.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us