Home » अग्निकांडातील मृतांची संख्या सहावर! चार महिलांनंतर बाप-लेकाचाही मृत्यू; बेळगाव हादरले

अग्निकांडातील मृतांची संख्या सहावर! चार महिलांनंतर बाप-लेकाचाही मृत्यू; बेळगाव हादरले

file_000000008fa48211afe5211acf3539c7

अग्निकांडातील मृतांची संख्या सहावर! चार महिलांनंतर बाप-लेकाचाही मृत्यू; बेळगाव हादरले

बेळगाव : गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री चव्हाट गल्ली परिसरातील ढोर गल्ली येथे घडलेल्या भीषण अग्निकांडाने संपूर्ण बेळगाव शहर हादरले आहे. या दुर्घटनेत सुरुवातीला एकाच कुटुंबातील चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर गंभीररीत्या भाजलेल्या गजानन दमोने (६५) आणि त्यांचा मुलगा रोशन दमोने (२१) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे.

गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करून कुटुंबातील सर्वजण झोपले असताना मध्यरात्रीच्या सुमारास घराला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत चार महिलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता.

गंभीर भाजलेल्या गजानन दमोने आणि त्यांचा मुलगा रोशन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याने दमोने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप तपासाधीन आहे. प्राथमिक तपासात फ्रिजमधील बिघाड अथवा शॉर्टसर्किटचा संशय व्यक्त करण्यात आला असून, FSL आणि HESCOMकडून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गणेशोत्सवाच्या आनंदावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत

या हृदयद्रावक घटनेमुळे चव्हाट गल्ली-ढोर गल्ली परिसरात शोककळा पसरली असून, गणेशोत्सवाच्या आनंदाच्या वातावरणावर दुःखाचे सावट आले आहे.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us