बेळगाव: कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.आनंद यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले असून यामुळे कॅम्प परिसर हादरून गेला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचारी भरतीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी बंगलोर आणि दिल्ली येथून आलेले सी बी आय अधिकारी करत होते.के आनंद यांच्या सोबत कॅन्टोन्मेंट बोर्डातील अधिकाऱ्यांची देखील सी बी आय अधिकारी कसून चौकशी करत आहेत.गेल्या दोन दिवसापासून के आनंद आपल्या शासकीय निवासस्थानात होते.शनिवारी सकाळी त्यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दोन दिवस झाले दरवाजा उघडला नाही आणि घरातून दुर्गंधी येत असल्याचे कॅम्प पोलिसांना कळवले.कॅम्प पोलिसांनी त्वरित जावून दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता के आनंद हे मृतावस्थेत आढळले.घटनेचे वृत्त कळताच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.के आनंद हे मूळचे चेन्नई येथील असून ते 2015 च्या इंडीयन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसच्या बॅचचे तरुण अधिकारी होते.ते अविवाहित होते.