
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर येथील मलप्रभा नदी घाटावर संत निरंकारी मंडळ दिल्ली, शाखा बेळगाव -;खानापूर यांच्यावतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. रविवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खानापूरचे नगराध्यक्ष मीनाक्षी बैलूरकर, नगरसेवक आप्पा या कोडोली, नगरसेवक प्रकाश बैलूरकर नगरसेविका जया भूतगी यासह अनेकजण उपस्थित होते. संत निरंकारी मंडळाचे बेळगाव शाखेचे संयोजक प. आ.शशी आनंदजी ज्ञानप्रचारक प. आ.व्हि. एन. लासेजी, सेवा दलाचे रवी, सेवादल अधिकारी व सर्व मुखी अधिकारी व सर्व संत संघत उपस्थित होते.


खानापूर येथील मलप्रभा नदी घाटावर आज स्वच्छता अभियान करण्यात आले. या स्वच्छता अभियानात आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही स्वतः सहभाग दर्शविला. नदीघाटाच्या दक्षिण घाटावर अति दुर्गंधी व कचऱ्याचे साम्राज पसरले होते. घाटाच्या पायऱ्यावर माती साचून दुर्गंधी पसरली होती. शिवाय या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून साचलेली घाण दूर करण्यासाठी या निरंकारी मंडळाने उपक्रम हाती घेतला. यावेळी निरंकारी मंडळाच्या सेवा दलाचे अनेक स्वयंसेवक भगिनी उपस्थित होत्या, या ठिकाणी असलेली संपूर्ण घाण बाजूला करून स्वच्छ घाट पायऱ्या करण्यात आल्यामुळे निरंकारी मंडळाने घेतलेल्या या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात आले. यावेळी पाहुणे म्हणून उपस्थित आमदार विठ्ठल हलगेकर यांनी निरंकारी मंडळाने खानापूरच्या नदी घाटावर घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. निरंकारी मंडळ नेहमी स्वच्छता राखा, पाणी वाचवा, झाडे लावा असे अनेक अभियान राबवत समाजाला संदेश देण्याचे काम करत असतात. त्याच्यातलाच एक भाग स्वच्छता अभियान हाती घेऊन या मंडळांनी केलेला हा उपक्रम समाजाला प्रेरणादायी ठरेल असे उद्गार त्यांनी यावेळी केले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांचा निरंकारी मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले.

