खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- बेळगाव खानापूर पुणे मित्र मंडळाचा स्नेह मेळावा तथा मार्गदर्शन शिबिर व गुणीजनांचा सत्कार समारंभ येत्या शनिवार दि. 6 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुणे येथील धायरी मुक्ताई गार्डनमध्ये दि.6 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित या सत्कार सोहळ्याला अनेक मान्यवरांची वंदनीय उपस्थिती राहणार आहे. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बेळगाव खानापूर पुणे मित्र मंडळाचे अध्यक्ष पीटर डिसोजा हे राहणार असून या सोहळ्यासाठी खास खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, पुणे धारेसर विद्यालयाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण आधी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
- शिवाय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री नारायण रामजी अध्यक्ष, बेळगाव मित्र मंडळ पुणे, श्री दत्ताराम भेकणे अध्यक्ष, BPL Foundation पुणे, श्री अनिल देसाई अध्यक्ष, विश्वभारती कला-किडा फाऊंडेशन बेळगाव, श्री लक्ष्मण काकतकर उपाध्यक्ष, श्री नारायण पाटील उपाध्यक्ष, श्री शिवाजी जळगेकर सचिव, केशव जावळीकर संचालक, श्री देमानी मशनूचे संचालक, श्री राजाभाऊ लायगुडे मा. नगरसेवक, म. न. पा. पुणे श्री बाळासाहेब पोकळे अध्यक्ष, विश्वास ग्रुप पुणे, श्री मोहन पाटील अध्यक्ष, बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था पुणे, श्री रामू गुंडप अध्यक्ष, KPL Foundation पुणे, सचिन पाटील अध्यक्ष, महा बेळगाव माईट्स फाउंडेशन पुणे,
- खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ चे उपाध्यक्ष लक्ष्मण काकतकर, उपाध्यक्ष बाळासाहेब देसाई, रामू गुंडप उपाध्यक्ष, सुरेश हलगी सहसचिव, नारायण गावडे संचालक, राजाराम शिंदे ,संचालक ,श्री रामचंद्र निलजकर उपाध्यक्ष, श्री अशोक पाटील उपाध्यक्ष, श्री रामचंद्र बाळेकुंद्री खजिनदार, श्री बाळकृष्ण पाटील संचालक, श्री परशुराम चौगुले उपाध्यक्ष, श्री विजय पाटील संचालक, श्री परशराम निलजकर सहखजिनदार संचालक पांडुरंग पाटील खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ सर्व सभासद उपस्थित राहणार आहेत.
- तरी सर्व खानापूर, रामनगर, अळनावर, हलियाळ, तत्सम भागातील पुणेस्थित नागरीकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा. तसेच जे विद्यार्थी इयत्ता दहावी, बारावी व पदवीच्या परिक्षा उतीर्ण झालेले आहेत, त्यांनी खालील संचालकांकडे आपली नावे नोंदवावीत, अधिक माहितीसाठी परशराम निलजकर ९८२२२ १८७९८, नारायण गावडे ९८५०१ ८८३४९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.