नैऋत्य रेल्वेसाठी ₹ 7329 कोटी रुपयांची भरीव तरतूद
बेळगाव-: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये नैऋत्य रेल्वेसाठी ₹ 7329 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. राज्यात नवीन रेल्वेमार्ग निर्मितीसोबतच दुपदरीकरणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आाहे. तर बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वेमार्गासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केल्याने South Western Railway रेलवे विभागात रेल्वेच्या विकासकामाना गती मिळणार आहे.
दोन वर्षापूर्वीच्या अर्थसंकल्पातही पिंकबुकमध्ये रेल्वेमार्गासाठीची तरतूद करण्यात आली होती. 50 टक्के खर्च राज्य सरकार तर 50 टक्के खर्च केंद्र सरकार करणार आहे. परंतु, शेतकन्यांनी भूसंपादनाला आक्षेप नोंदविल्यामुळे हा रेल्वेमार्ग रखडला आहे. परंतु, गुरुवारी या रेल्वेमार्गासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने रेल्वेमार्ग होण्याची शक्यता आहे. नैऋत्य रेल्वेला विकासकामांसाठी एकूण 7329 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रकल्पाचा समावेश आहे.
सध्या असणारा बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग खानापूरच्या घनदाट जंगलातून जातो. यामुळे रेल्वेची गती वाढविण्यावर निबंध येत आहेत. त्याचबरोबर बेळगाव-धारवाड अंतरही दूर होत आहे. यासाठीच बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर असा 73 किलोमीटरचा रेल्वेमार्ग 2020-21 मध्ये रेल्वेमंत्रालयाने मंजूर केला आहे. या रेल्वेमार्गासाठी एकूण 927 कोटी रुपये खर्च येणार आहे. 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये या रेल्वेमार्गासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कर्नाटक इंडस्ट्रीयल एरिया डेव्हल्पमेंट बोर्ड (केआयडीबी) च्या माध्यमातून भूसंपादनाची प्रक्रिया बेळगाव व धारवाड जिल्ह्यांमध्ये राबविली जाणार आहे. या रेल्वेमार्गासाठी 888 एकर जागा संपादित केली जाणार आहे.
बागलकोट-कुडची रेल्वेमार्ग 410 कोटी. लोंढा-मिरज रेल्वेमार्ग दुपदरीकरण 200 कोटी. होस्पेट-तिनईघाट-वास्को रेल्वेमार्ग दुपदरीकरण 400 कोटी. त्यामुळे भविष्यात नैऋत्य रेल्वेची विकासात्मक एक्स्प्रेस गतीने धावणार आहे.