- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन गावांना जोडणाऱ्या जंगलाच्या वाटेतून मुले शाळेकडे जात होती. दरम्यान एका झुडपातून दोन लहान पिला समवेत एक अस्वल रस्त्यावर आली. आणि दुचाकीस्वारकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना पाठीमागून चालत येणाऱ्या चौथी ,पाचवीच्या शाळकरी मुलांनी पाहिली आणि तिथून त्यांनी पुन्हा भीतीने घर गाठले. व आपला जीव वाचवल्याची घटना खानापूर तालुक्यातील ढोकेगाळी येथे घडली.
- याबाबत मिळालेली माहिती की येथील सोनाप्पा शटवापा पाटील हे ढोकेगाळी हून दुचाकी वरून हारुरी गावाकडे जात होते. काही अंतरावर केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला अस्वलाची दोन पिले व एक अस्वल असल्याचे दिसून आले. सदर दुचाकी दिसतात त्या अस्वलाने पिलाच्या रक्षणासाठी आरडाओरडा केला. दुचाकीवरील सोनापाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान आणि दूध तिथून पुढे गेला व शाळकरी मुलांनीही तिथून घराकडे जाणे पसंत केले. त्यानंतर गावातील काही पालकांनी मुलांना शाळेकडे सोडले तोवर ते अस्वल तेथून निघून गेले होते. पण या परिसरात अस्वलाचे वास्तव असल्याने ढोकेगाळी विभागातील शाळकरी मुलाचं नागरिकात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन खात्याने या परिसरात वावरणाऱ्या अस्वलांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.