गस्टोळी : खानापूर तालुक्यातील गस्टोळी येथील रहिवासी व खानापूर तालुका भाजपाचे सक्रिय युवा नेते व हेस्कॉमचे कंत्राटदार बाबान्ना नागेंद्र पाटील वय वर्षे 42 यांचे रात्री बाराच्या दरम्यान दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन, भाऊ, आई,बहिण असा परिवार आहे ते अविवाहित होते. भाजपाचे मंत्री श्री रामलु यांचे ते अगदी जवळचे व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते. अंत्यविधी आज शुक्रवार दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12:30 च्या दरम्यान गस्टोळी येथे करण्यात येणार आहेत, श्री बाबांना पाटील हे 2018 च्या विधानसभा निवडणुकीत इच्छुक म्हणून त्यांनी चांगलीच रणनीती आखली होती. परंतु गेल्या काही दिवसापासून त्यांना गंभीर आजाराने घेतल्याने ते राजकारणापासून फारच दूर होते. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते गुरुवारी रात्रीच्या सुमारास दवाखान्याला घेऊन जात असताना त्यांना आजारातच हृदय विकाराचा झटका आल्याचे कळते. त्यांच्या जाण्याने भाजपात गंभीर शोककळा पसरली आहे.