
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
येत्या 21 जानेवारी रोजी बेळगाव येथे कर्नाटक अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने होणाऱ्या ” गांधी भारत” कार्यक्रमासाठी खानापूर तालुक्यातून बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यानुसार विभागावर बैठक यांचे आयोजन केले जात आहे. आज शुक्रवारी जांबोटी येथे या भागातील सक्रिय कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली व गांधी भारत या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व गांधी भारत कार्यक्रमास संदर्भात माहिती दिली. यावेळी भूलवाद समितीचे सदस्य विनायक मुतगेकर, दीपक कवटणकरपवन चौगुले मारुती मिस्त्री, मिलाश्रीन मेंडोंसा, मुस्ताक सनदी, गोपाळ नाईक, उपेंद्र नाईक, दीपक नावलकर, प्रियांका गावकर, मोहन नाईक, परसराम नाईक, तुकाराम गावडे, परसराम गावडे, उमेश नाईक, मारुती बोटणकर यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
