- खानापूर लाईव्ह /प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षापासून तटपुंजी पगारावर अतिथी शिक्षक म्हणून काम करणाऱ्या अनेक शिक्षकांच्यावर राज्य सरकारकडून अन्याय केला जात आहे. सरकारने शिक्षक भरती क्रिया हाती घेतली असून चालू वर्षात काम करणाऱ्या अतिथी शिक्षकांना शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच घरी बसण्याची वेळ येत आहे. त्यांच्या कौटुंबिक उदरनिर्वाहाची समस्या लक्षात घेता नेमणूक केलेल्या अतिथी शिक्षकांना कमी करू नये, त्यांना कायमस्वरूपी सेवेत दाखल करावे अशी मागणी करणारे निवेदन खानापूर तालुका अतिथी शिक्षक संघटनेच्या वतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांना एका निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
- खानापूर तालुका अतिथी शिक्षण संघटनेची 28 ऑक्टोबर रोजी शैक्षणिक वर्षातील दुसरी बैठक पार पडली. या मीटिंगमध्ये खानापूर तालुक्यातील अतिथी शिक्षकांच्या समस्यांची सविस्तर चर्चा करण्यात आली. आपल्याला 2023 ते 2024 या शैक्षणिक वर्षासाठी नेमणूक करून घेतली. पण येत्या काही दिवसात परमनंट शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे अतिथी शिक्षकांना शैक्षणिक वर्ष संपायच्या अगोदर घरी बसण्याची वेळ आली आहे. बरेच शिक्षक विवाहित असून त्यांची घरची फॅमिली त्यांचे वर अवलंबून आहे. पण आज त्यांना घरी बसावे लागले तर त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी खूप समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
- उदाहरणार्थ : कुमारी रूपा गडादी गाव तुक्केनटी यांनी गेली पाच वर्ष K H P S तुक्केनटी शाळेत प्रामाणिक सेवा बजावली. पण या अतिथी शिक्षकांचे पुढील भविष्य काहीच नसल्याने तसेच आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागल्याने, अतिथी शिक्षकांचा पगार चार महिन्यातून एकदा होतो. तोही फक्त दहा हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे. म्हणून त्यांना आत्महत्या करण्यापासून पर्याय सुचला नाही. रूपा गडादी या अतिथी शिक्षिकेने 27 ऑक्टोबर 2023 रोजी आत्महत्या केली त्या अतिथी शिक्षकेला संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. अशाप्रकारे अतिथी शिक्षकांना मानसिक त्रास पडू नये. यासाठी सरकारने अतिथी शिक्षक म्हणून गेल्या काही वर्षातून काम केलेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत दाखल करून घ्यावे.
- 2023 ते 24 सालातील सर्व अतिथी शिक्षकांना शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत सेवा करण्याची संधी द्यावी.
- प्रत्येकी महिना संपल्याबरोबर त्या महिन्याचा पगार करावा.
- सरकारने अतिथी शिक्षकांना आजच्या महागाईचा विचार करून वाढीव मानधन द्यावे.
- पंजाब, हरियाणा, दिल्ली, गोवा, यासारख्या राज्याप्रमाणे अतिथी शिक्षकांना नोकरीमध्ये कायम ( परमनंट ) करून घेणे.
या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या खानापूर तालुक्यातील आमदार व सर्व समाजसेवक, तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी, डी डी पी आय , बी ओ, या सर्वांनी मिळून आपल्या तालुक्यातील अतिथी शिक्षकांच्या समस्यांचे निवारण करण्यास प्रयत्न करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. अशी खानापूर तालुका अतिथी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी अतिथी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मोहन पाटील, नागेंद्र पाटील, संतोष जाधव, गणपती बावकर, अमर कांबळे, सुहास कदम, प्रमोद बागेवाडकर, महादेव चौगुले, विश्वनाथ कुलम, गजानन घाडी, अतिथी शिक्षिका मीनाक्षी ओउळकर, अश्विनी कुंभार, अश्विनी जाधव, प्रतिभा अल्लोळकर, तनुजा गुरव, प्रिया पाटील, दिपाली करंबळकर, श्वेता मंडोळकर, आरती चौगुले, मनीषा पाटील, सुनिता चोपडे. आधी उपस्थित होते.