गोवा:
हलगा ता. खानापूर येथील मराठी हायर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरुण आप्पाजीराव पाटील यांना गोवा येथे आदर्श मुख्याध्यापक व धार्मिक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावर्षीचा गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ गोवा आणि इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा “आदर्श शिक्षक व धार्मिक गौरव” हा राष्ट्रीय पातळीवर पातळीवरील गौरव आशिया पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कारासाठी दरवर्षी दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र,गुजरात, गोवा या राज्यातून विशेष प्रतिनिधींची निवड केली जाते.
सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रोलर डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीने 2023 मधील हा राष्ट्रीय गौरव पुरस्कार बेळगाव जिल्ह्यातून हलगा ता. खानापुर मराठी हायर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरुण अप्पाजीराव पाटील यांना गोवा येथील गणपतराव पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरबल सोसायटी या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
मुख्याध्यापक अरुण पाटील हे यापूर्वी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. त्यांनी आपल्या जीवनात अनेक विद्यार्थी घडवून एक प्रामाणिक शिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावत आले आहेत. त्यांच्या प्रामाणिक शिक्षकी सेवेची दखल लक्षात घेता हा विशेष गौरव पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सासनूर यांच्या हस्ते त्यांना बहाल करण्यात आला . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूरचे माजी आमदार संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस अधिकारी अरविंद घंटी, हरमल सरपंच अमित सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमात स्वागत संजय पाटील यांनी केले. यावेळी जवळपास देश-विदेशातून 170 गुणवत्ताना हा विशेष राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक अरुण पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.