IMG-20230317-WA0062

2001 मध्ये पहिल्यांदा नंदगड ग्रामपंचायतीवर निवडून आल्यानंतर 2003 मध्ये मेरडा प्राथमिक कृषी संघाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात पदार्पण केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असणान्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत खानापूर तालुक्यातून मराठी माणूस संचालक म्हणून निवडून जाणे अशक्य असताना शिवधनुष्य पेलले. एवढेच नाही तर पुढे जाऊन इतिहासही रचला. 2005 मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून धुरा स्वीकारली. आणि तिथूनच आपल्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली असल्याचे मनोगत माजी आमदार व भाजप नेते अरविंद पाटील यांनी खानापूर लाईव्ह बोलताना दिली.

खानापूर तालुक्यात दोन दशकापूर्वीची राजकीय परिस्थिती आणि आजच्या बदलत्या स्वरूपातील राजकीय परिस्थितीत फारच फरक झाला आहे प्रारंभीच्या काळी लोकांची साधलेला संवाद व जवळीक ही आजच्या घडीला पाठबळ देणारी ठरते 2005 मध्ये जेव्हा आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून आलो तेव्हा केवळ 10ते 12 संस्था होत्या. त्याही रडतखडत चालल्या होत्या त्या काळात प्रस्थापितांकडून केवळ निवडणुकांत संचालकपद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांचा वापर केला जायचा. तालुक्यातील पतसंस्थांचा (पत) केवळ रुपये 2 कोटी 25 लाख इतका होता. आज ही पत 90 कोटींच्या घरात पोचली. विविध धाडसी निर्णय घेत जनतेचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तळागाळाची कार्यकत्यांच्या गाठीभेटी घेणे छोट्यामोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, जनसामान्यांच्या समस्या सोडविणे, साजेशा देणग्या वा बक्षिसे देणे असे समाजघटकांस प्रोत्साहन देण्याचे कार्य दमदारपणे सुरु झाले. 2009 च्या मध्यावधी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली. पण, स्वकिय 13 उमेदवार रिंगणात उमे ठाकल्याने राष्ट्रीय पक्षाची सत्ता आली. पण त्या पराभवाला न जुमानता पुन्हा राजकीय स्ट्रगल म्हणून चार-पाच वर्षांचा कालावधी त्यावेळी फायद्याचा ठरला. 2013 च्या निवडणुकीत ते कार्यकत्यांच्या जोरावर निवडून विधानसभेत गेले गेलेली सत्ता पुन्हा समितीच्या पदरात पाडवी व या चळवळीला पुन्हा मिळाली. आमदार म्हणून एक सुशिक्षित आणि धाडसी व्यक्तिमत्व खानापूर तालुक्यास मिळाले. दरम्यान त्यांनी मोडीत आलेल्या सहकार क्षेत्राला नवसंजीवनी दिली.. बंद पडलेल्या दुध डेअरी पुन्हा सुरु केल्या. राजकारणाला विकासाची नवी दिशा दिली..

तालुक्याच्या विकासासाठीच भाजपात प्रवेश

जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत खानापूर तालुक्याला सर्वांगीण विकासापासून वंचित राहावे लागले. चळवळीत काम करत असताना स्वकियांकडून सातत्याने पाय ओढण्यात आले. त्यांच्याशी वादविवादात भरपूर वेळ गेला. परिणामी शेतकन्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न बाजूला राहिले. त्याकरिता राष्ट्रीय पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तालुक्यातील माझ्या असंख्य चाहते व सहकारी मित्रांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व भावी राजकारणाच्या पटलावर बदल घडवून आणण्यासाठी भाजपात प्रवेश केला. यामध्ये विशेष व प्रामुख्याने भाजपचे कार्य व भाजपमधील आपल्या वरिष्ठांची असलेले मित्रत्वाचे नाते आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यमुळे प्रेरित होऊन भाजपा प्रवेश केला आहे.

सत्तेत असताना किंवा नसताना भाषा, धर्म, जात असा कोणताही भेद न ठेवता सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. प्रामुख्याने शेतकन्यांच्या साठी शक्य होईल का वेळ दिला. बोकाळलेला भ्रष्टाचार, विकासकामातली टक्केवारी दादागिरी हे सर्व संपुष्टात आणले. भूमिपुत्रांच्या हाताला काम दिले. त्यामुळे यांचे प्रेम आणि विश्वास टिकून आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्याचा सर्वांगीन वीकास, सर्वसामान्यांच्या व्यथा, तरुणाचे प्रश्ण सोडविण्यासाठी राजकारणासह समाजकारण करणार असल्याचा निश्चय केला आहे. रचनात्मक कार्याकडे सर्वांगीण विकासाकडे आणि समृद्धीकडे मी कार्य करत असताना आपल्या सर्वाच्या सहकार्याची अपेक्षा ठेवतो. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यापासून आतापर्यंतची माझी राजकीय वाटचाल अत्यंत खडतर होती. कोणताही राजकीय वारसा नसल्याने प्रस्थापितांच्या कुटिल डावांना न डगमगता मागे न पाहता पुढे चालत राहिलो. निठावंत कार्यकर्ते आणि ज्येष्ठांनी वेळोवेळी नवी ऊर्जा आणि उमेद दिली. त्याच्या जोरावरच आजपर्यंत मी खंबीर आहे. पुन्हा तीच ऊर्जा, तीच उमेद ठेऊन रणसंग्रामात उतरतो आहे. आव्हानांना पेलण्यासाठी तुम्ही नक्की साथ द्याल, यात शंका नाही.. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले तसेच आज सतरा रोजी होणाऱ्या माझ्या 55 व्या

वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील तमाम हितचिंतक, अभिमानी, भाजप कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून मला पाठबळ द्यावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us