खानापूर: खानापूर तालुक्याच्या सहकारी सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात सर्वसामान्यांची नाळ जोडलेले प्रभावी व्यक्तिमत्व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व भारतीय जनता पार्टीचे प्रभावी नेते श्रीमान अरविंद चंद्रकांत पाटील यांचा शुक्रवार दि. 17 मार्च 2023 रोजी 54 वा प्रकट दिन अर्थात जन्मदिन आहे. हा त्यांचा जन्मदिन उत्साहात व नाविन्यपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी गौरव समितीच्या वतीने जय तयारी हाती घेण्यात आली आहे.
यानिमित्ताने खानापूर येथील तालुका मलप्रभा क्रीडांगणावर होणाऱ्या या जन्मदिन विशेष सोहळ्यात माजी आमदार अरविंद पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. येथील तालुका मलाप्रभा क्रीडांगणावर भव्य शामियाना घालण्यात येत असून याची जय्यत तयारी हाती घेण्यात आली आहे. या वाढदिनाच्या निमित्ताने जवळपास वीस हजारहून अधिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व माजी आमदार अरविंद पाटील यांचे हितचिंतक तालुक्यातील कृषी पतीन सहकारी संघाचे पदाधिकारी, भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन वाजता यानिमित्ताने विशेष व्यासपीठाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील अनेक मंत्री गण आजी-माजी आमदार व राजकीय क्षेत्रातील सर्व प्रभावी नेतेमंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी माजी आमदार व भाजप नेते अरविंद पाटील वाढदिवस गौरव समितीच्या वतीने जयत तयारी हाती घेण्यात आली हे खानापूर शहर परिसरात माजी आमदार अरविंद पाटील यांचे बॅनर्स मोठ्या प्रमाणात झळकत आहेत. त्यामुळे त्यांचा हा वाढदिवस हजारो हितचिंतकांच्या व कार्यकर्त्यांच्या साक्षीत होणार आहे.
खानापूर तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन गौरव समितीचे अध्यक्ष बाबुराव देसाई, यांनी केले आहे.