खानापूर
खानापूर/ प्रतिनिधी:
गेल्या 25 वर्षापासून समाजसेवेचा विडा उचलत आजतागायत काम करत असताना जनतेने माझ्या पाठीशी राहून साथ दिली आहे. गेल्या 25 वर्षात मी समाजासाठी स्वतःला वाहून घेतले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विस्तारासाठी खानापूर तालुक्यात अनेक कृषी पतीन संस्थांचे जाळे उभारत शेतकरी हितावह योजना करण्याचे काम, 2013 मध्ये आमदार पदावर विराजमान झाल्यानंतर जनतेने दिलेले प्रेम, यामुळेच मला अविरतपणे काम करण्याची ताकद मिळाली आहे. मागील आमदारकीच्या काळात जे प्रेम आपण जनतेने दिलात, तसेच प्रेम आगामी राजकारणात माझ्या पाठीशी राहावे, खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करत असताना डबल इंजिन सरकारने आखलेल्या योजना तळागाळातील लोकांच्या परत सुबद्धतेपणे पोहोचवण्यासाठी तालुक्यात भाजपचा आमदार झाला पाहिजे.भाजपा कमळ फुलवण्यासाठी आपण कायम पाठीशी राहावे असे आवाहन माजी आमदार अरविंद पाटील यांनी केले.
समिती सोडलो म्हणजे जात सोडली नाही.
यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या 60 वर्षापासून खानापूर तालुक्यात आमदार होऊन गेले. कोणी आमदाराने स्वतः खिशातून पैसे घालून गरिबांची घर चालवली नाहीत. किंवा तालुक्याचा विकास केला नाही जनतेने दिलेल्या आशीर्वादातूनच शासकीय कामे राबवली जातात. त्यामूळे आम्ही तालुका चालवतो असे म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता जनतेने जागा दाखवली पाहिजे. जनतेने दिलेल्या आशीर्वादाने मी समितीतून आमदार झालो. सरकारी निधीचा जनतेपर्यंत लाभ मिळवून दिला. त्यामुळे मी केलो हे सांगणे चुकीचे आहे. आज समितीतून आपण बाहेर पडलो म्हणजे आपण जात बदललो नाही. मराठी भाषा, मराठी बद्दलचे प्रेम ही आमच्या नसानसात भिणलेली आहे. मी तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी भाजपात प्रवेश केला आहे.त्यामुळे आपल्याबद्दल कोणी अकडपकड बोलत असेल तर त्यांचे दात दाखवायला माझ्याकडेही उत्तरे आहेत. आता सीमा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने आता तालुक्याच्या विकासासाठी भाजपच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन माजी आमदार अरविंद पाटील यांनी आपल्या 54 व्या वाढदिनाच्या निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष बाबुराव देसाई होते.
अरविंद पाटील पुढे म्हणाले, खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास व तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी खानापूर तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी सक्षम आहेत. जन्मजात पिंड बांधलेल्या या लोकांनी तळागाळातील लोकांची आपली नाळ जोडली आहे असे असताना मागील 2018 च्या निवडणुकीत पैशाच्या आमिषाला बळी पडून तालुक्यातील व्यक्तीला हे पद झुकल. तालुक्यातील चुकीने दिलेल्या एका मतामुळे आज तालुक्याच्या विकासाला मोठी खीळ बसली आहे. ती वेगवेगळ्या स्वरूपात तालुक्यातील जनतेला किंमत मोजावी लागली आहे.विद्यमान आमदारांनी भ्रष्टाचाराचा कळस केला असून तो समूळ नष्ट करण्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी भाजपच्या पाठीशी राहून खानापूर तालुक्यात कमळ निवडून आणण्यासाठी आशीर्वाद करावा असे आवाहन केले, व वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित हजारो हितचिंतक, कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल त्यांनी नतमस्तक होऊन उपस्थित त्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमात प्रारंभी माजी आमदार अरविंद पाटील व त्यांच्या पत्नी सौ स्वामिनी पाटील यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन पूज्य श्री शंभुलिंग शिवाचारस्वामीजी,चनबसव देवरू अवरोळीमठ, आडवी सिद्धेश्वर स्वामीजी आदी पूज्य श्री स्वामीजींच्या सानिध्यात माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यसभा सदस्यांना कडाडी,बैलहोंगलचे आमदार महांतेश दोड्डगौडर, माजी आमदार जगदीश मेटगुड, भाजप अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते विठ्ठल हलगेकर,भाजप नेते विठ्ठल पाटील, जोतिबा रेमानी, सुभाष गुळसट्टी श्रीमती मंजुळा कापसे, किरण येळूरकर, पंडित ओगले सुरेश देसाई,राजश्री देसाई,वासंती बडगेर यासह अनेक जण उपस्थित होते.
निष्ठेला फळ नक्कीच मिळणार
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सौदी म्हणाले, भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षनिष्ठा राखून काम केलेल्या व्यक्तीला नक्कीच लाभ नशीबाची साथ असेल तर पदे धावून येतात त्यासाठी आपण राजकारणात काम करताना निष्ठेने काम करावे असे सुतोवाच उपस्थितांना करून अरविंद पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपल्याशी मनापासून मैत्री केली. त्या मैत्री खातर महत्त्वाची कामे सोडून या ठिकाणी आपण उपस्थिती दर्शविली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने माजी आमदार अरविंद पाटील यांच्यावर दाखवलेले प्रेम असेच कायम ठेवावे, भाजपातून अनेक जण इच्छुक आहेत. पण ज्याच्या त्याच्या कार्याची व मागील कामाची दखल लक्षात घेता ज्याच्या नशिबी उमेदवारीचे भाग्य आहे. त्याच्या पाठीशी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले. अरविंद पाटील यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी राज्यसभा सदस्यांना कडाडी म्हणाले, खानापूर तालुक्यात भाजप संघटना मजबूत आहे मागील वेळेला झालेली चूक पुन्हा यावेळी तालुक्यातील जनतेने करू नये. भाजपातील जेष्ठ सक्रिय कार्यकर्त्यांनी व इच्छुकांनी एकसंघ व एकजूट राहून या निवडणुकीत कार्य करावे असे सुचित करून त्यांनीही अरविंद पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कर्नाटक मराठा प्राधिकरणाचे अध्यक्ष मारुतीराव मुळे यांनी मराठा समाजासाठी अमलात आणलेल्या योजना सरकारचे धोरण व शिवरायांचा आदर्श याबद्दल मार्मिक मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार महंतेश दोड्डगौडर, भाजपा अध्यक्ष संजय कुबल, यांनीही विचार मांडले. गौरव समितीचे अध्यक्ष बाबुराव देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्तावना केली. कार्यक्रमात गौरव समितीच्या वतीने तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते माजी आमदार अरविंद पाटील यांचा सत्कार व अभिष्टचिंतन करण्यात आले. सत्कार सोहळ्याला खानापूर तालुक्यात यातून जवळपास 12000 हून अधिक कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या.