IMG_20241208_081747

खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी : प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी रोज मैदानी खेळात भाग घ्यावा ज्यामुळे संघ भावना आणि विद्यार्थी वर्गात एकी निर्माण होते असे मत संस्थेचे चेअरमन अधिवक्ता चेतन अरुण मणेरीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. खानापूर येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे शुक्रवार दिनांक ६/१२/२०२४ रोजी थाटात उद्घाटन झाला . यावेळी ते उद्घाटक पर भाषणात बोलत होते.

या उद्घाटन समारंभाला टिळकवाडी, बेळगांव येथील सुप्रसिद्ध ” डिजिटल फिटनेस हबचे” संस्थापक आणि बांधकाम व्यावसायिक श्री हर्षद कलघटगी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. योग्य व्यायाम आणि आहाराचे उत्तम व्यवस्थापन केल्यास कोणतीही व्यक्ती दीर्घायुषी होऊ शकते असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यदर्शी श्री सुहास वामनराव कुलकर्णी, सहकार्यदर्शी श्री गुलाब मांगीलाल जैन, माजी सचिव श्री सदानंद श्रीपादराव कपिलेश्वरी उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्या सौ.श्रद्धा दिपक पाटील यांनी स्वागत भाषण केले. शिक्षक श्री दिपक सखदेव यांनी आभार मानले. सौ. ज्योती जांबोटकर यांनी सूत्र संचलन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी उत्तम मार्च पास्ट आणि बहारदार नृत्य सादर केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठी उपस्थिती दर्शविली.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us