कोल्हापूर :
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक रथीमहारथी या निवडणुकीच्या प्रचारात भाग घेत आहेत. सीमाभागातील अनेक दिग्गज नेते मंडळी प्रचारात दंगली आहेत. महाविकास आघाडी तसेच महायुती यांच्यातील रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. खानापूर तालुक्याच्या माजी आमदार व राष्ट्रीय प्रदेश काँग्रेस पक्षाच्या सचिव, व कोल्हापूर भागातील निवडणुकीच्या प्रभारी, डॉ. अंजली निंबाळकर यांनी करवीर मैदानात त आपली तोफ डागली. सतेज पाटील यांच्या निवडणुकीच्या प्रचारात आयोजित प्रचार सभेत त्यांनी प्रियांका गांधी यांच्या समवेत सभेत प्रबोधन केले.
यावेळी बोलताना त्यांनी कर्नाटकात पंचहमी योजना राबवताना भाजपाने टीकेचे शस्त्र उभारले. मात्र कर्नाटकातील काँग्रेस सरकारने कधी न डगमगता ही योजना यशस्वीरीत्या पेलण्याचे काम केले आहे मात्र ते भाजपने मोडीत करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. यासाठी काँग्रेसने दिलेला मदतीचा व्यसनाचा हात हा कधीही मागे राहत नाही. महाराष्ट्रातील या राजकारणात कोणीही पक्षाचे चिन्ह आकडे न बघता आपले नेते उद्धव ठाकरे , शरद पवार , व राहुलजी गांधी यांच्याकडे पाहून महाराष्ट्राच्या सक्षम बांधणीसाठी महाविकास आघाडीला साथ द्या. असे सांगून शक्ती योजनेवर भाजप नेत्यांसह पंतप्रधान मोदी यांनी टीका केली असली तरी, निंबाळकर यांनी भाजप आणि महायुतीकडून होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. मोदी यांनी दिलेली आश्वासने कुठे गेली असाही सवाल केला. कर्नाटकमध्ये मराठा समाजाला आधार देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील महायुती सरकारला लोक कंटाळले आहेत, त्यामुळे जाती-धर्माच्या नावावर राजकारण चालू असल्याची टीका त्यांनी केली. शरद पवार, काँग्रेस, आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे लोकशाहीसाठी चांगले आहे, असेही त्यांनी नमूद केले
महाविकास आघाडी सरकार आल्यावर महिलांना तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गरिबांसाठी योजना गॅरंटी कार्डद्वारे दिल्या जातील, असे सांगत त्यांनी महायुती सरकारवर अदानी आणि अंबानी यांचे हितसंबंध जपल्याचा आरोप केला. गरिबांना गरीब ठेवण्याचे राजकारण सुरू आहे. त्यासाठी येत्या 20 तारखेला महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या रहावे येत्या 23 तारखेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार राहील असा दावा त्यांनी यावेळी केला.