IMG-20240327-WA0053

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

  • खरंतर, सध्या संपूर्ण देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू झाला आहे. देशाच्या उच्चस्रावर असलेल्या लोकशाहीच्या तक्तावर आपला लोकप्रतिनिधी पाठवण्याचे भाग्य प्रत्येक मतदाराच्या हाती आले आहे. खानापूर तालुका हा कर्नाटकाच्या व महाराष्ट्राच्या सीमावरती भागात मलनाड भाग म्हणून येतो. कर्नाटकाच्या उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघात केवळ कारवार जिल्ह्यातील मतदान संख्या अपुरी पडत असल्याने बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुका समाविष्ट करण्यात आला आहे. परिणामी आपले जवळचे बेळगाव असतानाही कारवार भागातून लोकसभेवर आपला नेता पाठवण्यासाठी /मतदान करण्याची वेळ आतापर्यंत आली, पण कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने आतापर्यंत खानापूर तालुक्याला उत्तर कन्नड जिल्ह्यातून (भारतीय जनता पार्टी अथवा ब्लॉक काँग्रेसच्या वतीने तसेच जनता दलाच्या वतीने) गेल्या 70 वर्षात झालेल्या 15 ते 16 लोकसभेच्या निवडणुकात कोणीही खानापूर तालुक्याला प्रतिनिधित्व दिले नाही. खानापूर तालुका हा 70% हून अधिक मराठा आणि मराठी भाषेत असल्याने या भागाला प्रतिनिधित्व देण्यास राष्ट्रीय पक्षानी आपल्या कादंबरीचे पान उघडले नाही. पण यावेळी ब्लॉक काँग्रेस पक्षाने पहिल्यांदाच खानापूर तालुक्याला प्रतिनिधीला संधी दिली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याला उत्तर कन्नड मधून आपला लोकप्रतिनिधी पाठवण्याची वेळ आली अजून तालुक्यातील मतदार राजा या उमेदवारीची जाण व स्वाभिमान राखतील अशी अशा पल्लवीत झाली आहे.

माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर एक मराठा उमेदवार!

  • खानापूर तालुक्यात मागील दहा वर्षात खानापूर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने झटत असणाऱ्या महिला नेत्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी गेल्या 2013 पासून खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत अनेक विकासाभिमुख कामे राबवण्यासाठी आपला विनम्रपणाचा हात घेऊन पुढे आल्या. डॉ. अंजलीताई फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने काम करत 2018 च्या विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व खानापूर तालुक्यातील मतदारानी दिले त्याचा लाभ घेत खानापूर तालुक्यात विकासाचे पाऊल हाती घेऊन अनेक मोठी कामे हाती घेतली. राज्यात मागील काळात भाजपचे सरकार असल्याने अनेक मंजुरीसाठी पुढे केलेले कामे रखडली, मात्र हार न मानता अनेक रस्त्यांची कामे, वैयक्तिक कामे तसेच दवाखाना बस आगार सारख्या कामांना मात्र त्यांनी मागे राहिल्या नाहीत. 2023 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राजकारणाच्या परिवर्तनात फेरबदल झाला तालुक्याने भाजपच्या हाती सत्ता दिली. हा लोक मताचा कौल आहे. हा लोकमताचा कौल मान्य करत डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी आपला संपर्क व तालुक्याच्या विकासाचा हेतू समोर ठेवून कर्नाटकातील सध्या असलेल्या काँग्रेस सरकारच्या राजवटीत अनेक कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी आपले प्रस्ताव ठेवले आहेत. राज्य सरकारने सुरू केलेली अनेक गॅरंटी योजना आपल्या खानापूर सह उत्तर कर्नाटकाच्या अनेक भागात पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ते मार्गी लागत असतानाच सध्या लोकसभेची होऊ घातलेले निवडणूक रणधुमाळी सुरू झाली. आणि कर्मधर्म संयोगाने पुन्हा एकदा डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना खानापूर तालुक्यातूनच नव्हे तर उत्तर कन्नड जिल्ह्यातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवारी देण्यात आली. हा खानापूरचा स्वाभिमान आहे.

प्रतिक्रिया:

कर्नाटकात मराठा उमेदवाराला लोकसभेची पहिल्यांदाच उमेदवारी!

  • कर्नाटकातून लोकसभेच्या निवडणुकीत आत्तापर्यंत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने येथील मराठी माणसाला प्रतिनिधित्व देण्यासाठी प्रोत्साहन दिले नाही. खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उत्तर कन्नड जिल्ह्यातून खानापूर तालुक्याला प्रतिनिधित्व देण्यात यावे अशी मागणी केली. यासाठी अनेक जण इच्छुक होते. परंतु भाजपाने खानापूर तालुक्याच्या मतदारांच्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते ही अस्वस्थ आहेत. खानापूर तालुक्यातील मराठी आणि मराठा मतदारांची जाण लक्षात घेता ब्लॉक काँग्रेस पक्षाने खानापूर तालुक्याला यावेळी प्रतिनिधित्व दिले आहे. याचा स्वाभिमान राखण्याची वेळ खानापूर मतदारांच्याकडे आता आली आहे. डॉक्टर अंजलीताई निंबाळकर या एक सुशिक्षित व पेशाने डॉक्टर असलेल्या उमेदवार आहेत त्यांची घरोघरी ओळख आहे त्यामुळे खानापूर तालुक्यातील जनता आपल्या स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी यावेळी नक्कीच उभी राहणार अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. खानापूर तालुक्यातून मराठा मतदाराने तसेच तालुक्यातील अन्य समाजातील मतदार बांधवांनी उच्चांकी मतदान द्या उत्तर कन्नड जिल्ह्याच्या इतर भागातून काँग्रेस पक्ष आपला उच्चांक गाठणार त्यामुळे यावेळी डॉक्टर अंजलीताई निंबाळकर ह्याच निवडून येणार असे वातावरण निर्माण झाले आहे.
  • प्रतिक्रिया: श्री विनायक मुतगेकर, अध्यक्ष खानापूर तालुका ग्रामपंचायत युनियन

प्रतिक्रिया:

भाजपचे सहा वेळा खासदार पण विकास शून्य!

  • या भागातून खासदार अनंतकूमार हेगडे यांच्या माध्यमातून सहा वेळा उच्चांकी मतदान देण्याचा विडा या भागातील मतदारानी घेतला. परंतु 5 वेळा निवडून आलेल्या खासदाराने खानापूर तालुक्याच्या विकासाकडे मात्र कानाडोळा केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला खानापूर तालुक्यातील जनता आता ओळखली आहे. गेल्या पंचवीस वर्षात केंद्र शासनाचे अनेक प्रकल्प असताना अपवाद वगळता खानापूर तालुक्यात एकही विकासाभिमुख काम राबवले नाहीत .मात्र सबुरीचे सल्ले देण्यात मात्र खासदार हेगडे साहेब विसरले नाहीत. याची जाण खानापूर तालुक्यातील मतदारांना झाली आहे. देशात पंतप्रधान मोदींचा करिष्मा आहे हे जरी खरे असले तरी खानापूर तालुक्याच्या विकासाचे गणित लक्षात घेता खानापूरची जनता यावेळी स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी उभा राहील. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कोणीही उमेदवार असोत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत परिवर्तनाचा भाग म्हणून खानापूर तालुक्यातील मतदार आस धरून राहिले आहेत. खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी सह इतर पक्षाचे नेते आपल्या पक्षाचा जरूर प्रचार करतील मात्र खानापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या सव्वा दोन लाखाच्या मतदानापैकी जवळपास 1 लाख 60 हजार मतदार येत्या 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत विचारपूर्वक मतदार करतील यात शंका नाही. कारण इतिहासामध्ये पहिल्यांदाच खानापुरातून काँग्रेस पक्षाने प्रतिनिधित्व दिले आहे. भारतीय जनता पार्टीने ही या भागातून मागणी केली पण त्यांना उमेदवारी मिळवण्यात साध्य झाले नाही. अन भाजप पक्ष खानापूरला उमेदवारी कधीही देणारही नाही. केवळ या भागातील मतांचा उपभोग मात्र घेऊन या तालुक्याकडे दुर्लक्ष करण्याचा हेतू ठेवला आहे. मात्र काँग्रेस पक्षाने डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या कार्याचा आढावा घेता या भागातून उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात दिलेले उमेदवारी ही अभिनंदन व काँग्रेस पक्षाने केलेली योग्य निवड म्हणावी लागेल. त्यामुळे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघा येणाऱ्या तेरा तालुक्यातून उच्चंकी मतदान देण्याचा विडा मतदारानी घेतला आहे.
  • प्रतिक्रिया: श्री लक्ष्मण कसरलेकर: अध्यक्ष, स्वयंभू श्री मारुती देवस्थान हब्बनहट्टी

कारवार जिल्ह्यात होणार उच्चांकी मतदान!

कारवार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अथवा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा जल्लोषी प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता खानापूर तालुक्याला मिळालेला हा स्वाभिमान शिवाय मराठी माणसाला मिळालेली ही उमेदवारी ही अभिमानास्पद असल्याने खानापूर तालुक्यातील एक एक मतदार त्यात बहुतांश असलेला मराठा मतदार नक्कीच निंबाळकर यांच्या पाठीशी राहणार यात शंका नाही. त्यामुळे इतर पक्षांचा कितीही मोठा प्रचार असो किंवा मोदी सरकारचा करिष्मा असो, यावेळी खानापूर तालुक्यातील जनता तथा सर्वपक्षीय लोक प्रतिनिधी राग, द्वेष, राजकारण, पक्षीय राजकारण, बाजूला ठेवून केवळ आणि केवळ खानापूर तालुक्याला मिळालेल्या या प्रतिनिधित्वाला नक्कीच खानापूर तालुक्यातून उच्चांकी मतदान करुन उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना निवडून आणतील यात शंका नाही. अशी आशा पल्लवीत झाली आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us