शिरशी: खानापूर : मराठा समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी डॉ. निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाचे संघटन करून ३ बी मधून २ ए मध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. भाजपने मराठा समाजाचा केवळ सत्तेसाठी वापर केला आहे. पण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. यामुळे आता उत्तर कर्नाटक मधील संपूर्ण मराठा समाजाने जागे होण्याची वेळ आली आहे. आज सर्व समाज आपला असला तरी समाजाला मिळालेले हे प्रतिनिधित्व समाजाच्या प्रगतीचे पाऊल आहे. यासाठी मराठा समाजाने आपला स्वाभिमान राखत डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट ईश्वर घाडी यांनी केले. रविवारी शिरशी राष्ट्रीय मराठा पक्षाच्या प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विरूपाक्ष स्वामीजी होते.
यावेळी बोलताना राष्ट्रीय मराठा पक्षाचे उपाध्यक्ष शामसुंदर गायकवाड यांनी केवळ राष्ट्रीय पक्षाने मराठा समाजाचा वापर करून घेतला आहे. पण आज कारवार लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाने दिलेले उमेदवारी मराठा समाजाचा स्वाभिमान राखणार आहे. यासाठी या स्वाभिमानाला प्रत्येकाने जागे राहावे व एक एक मत डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या पारड्यात टाकून त्यांना विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या, विकासापासून वंचित असलेल्या सर्व घटकांच्या उन्नतीबरोबरच मराठा समाजाच्या सर्वंकष विकासासाठी कटिबद्ध राहील. कर्नाटकच्या विधानसभेत कन्नडसह मराठी भाषेतून सातबारा उतारे व सरकारी कागदपत्रे द्यावीत यासाठी आवाज उठवला. मराठा समाजाला २ अ प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी यापुढेही आपला संघर्ष सुरुच आहे. या निवडणुकीत काँग्रेसने मराठा समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करुन दिली असून मतदारसंघातील अडीच लाखावरील मराठा समाज बांधव नक्कीच या संधीचा विनियोग करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी खानापूर , तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, मंगला काशिलकर (हल्याळ), शिर्सी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जगदिश गौडा, जोतिबा शिवणगेकर, विनोद साळुंखे (निपाणी) आदी यावेळी उपस्थित होते.