शिक्षण महर्षी श्री विठ्ठल हलगेकर यांच्या कर्तुत्वाला सलाम
चापगाव /पिराजी कुऱ्हाडे
याबाबत खरी हकीकत की, खानापूर तालुक्यातील चापगाव येथील कै.परशराम बरगुकर यांच्या अनाथ मुलीची ही कथा आहे. परसराम बरगूकर व त्यांच्या पत्नी लहानपणीच दोन मुलींना सोडून गेल्या. मोठी मुलगी स्वाती हिचा खानापूर येथे प्रभाकर वाघवडेकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर तिची लहान बहीण ज्योती अवघ्या तीन-चार वर्षाची असताना आईं वडिलांचा आसरा गेला. ज्योती अनाथ झाली, तिच्या जगण्याचा व वाढण्याचा आनंदच त्यावेळी निसर्गाने हिरावून नेला. पण मोठ्या बहिण असलेल्या स्वातीने धाडस करून तिची जबाबदारी घेतली. स्वतःच्या संसाराची, प्रतिकूल परिस्थिती असताना लहान बहिणीला जगवण्याचा भार तिच्यावर आला. पण अशा गंभीर परिस्थितीत त्या अनाथ मुलीची काळजी घेणारा एक देवदूतही त्यांच्यासमोर आला. कु. ज्योतीच्या अनाथ परिस्थितीची जाणीव भारतीय जनता पार्टीचे नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शांतिनिकेतन पब्लिक शाळेचे सर्वेसर्वा श्री विठ्ठल हलगेकर यांनी जाणली. क्षणाचा विचार न करता त्या मुलीला शाळेत दत्तकच घेतले. व तिचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च हाती घेऊन तिला लहानाचे मोठे केले. एक रुपयाचा खर्चही कु. ज्योतीची बहिण स्वाती तिच्यावर घातला नाही. आज ज्योती ही दहावी शिक्षण शिकत आहे.एक हुशार विद्यार्थिनी म्हणून म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. अशा या अनाथ मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व तिच्या उज्वल भविष्यासाठी श्री विठ्ठल हलगेकर सारखा एक शिक्षण महर्षी ‘अनाथांचा नाथ’ म्हणून देवदुतासारखा राहिला आहे. याची कृतज्ञता ज्योतीची बहीण स्वाती हिने भावनिकतेने व्यक्त केली.
श्री विठ्ठल हलगेकर यांच्या अंगी असलेला मानवतेचा व उदार भावनेचा हेतूच, सहकारी क्षेत्रातील उत्तुंग भरारीला तसेच अर्थव्यवस्थेतील भक्कम विचार धारेला व खानापूर तालुक्याच्या राजकीय पटलावरील गगन भरारीला, साथ देणारा ठरेल यात शंका नाही. त्यांच्या या मानवता कार्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमीच.