खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर तालुक्याच्या जंगलपट्ट्यातील नेहमी रस्त्याची समस्या भेडसावणारे गाव म्हणजे वरकड पाट्ये होय. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीची हाक शासन दरबारी व लोकप्रतिनिधीच्या कडे करूनही रस्ता अर्धवट आहे. गावापर्यंत येणारी बस कधी बंद होईल सांगता येत नाही. पण आम्हाला शाळेला जाण्यासाठी आमचा रस्ता आम्हीच करावा लागणार अशी वेळ शालेय विद्यार्थ्यांच्यावर येते तेव्हा प्रशासनाची किव आली तर यात नवल नाही. अशाच प्रकारे वरकड-पाट्ये गावाला जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था ना, कोणी लोकप्रतिनिधी, ना गावकरी करत नाहीत. रस्ता खराब झाल्याने गावाला येणारी बस कधी बंद होईल हे सांगता येत नाही. याची चिंता शाळकरी मुलांनाच. गावच्या रस्त्यावर पडलेले खड्डे व निसरडीची वाट पाहता अनेक वेळा दुचाकी धारकांची होणारे अपघात कमी नाहीत . पण शाळकरी मुलांना पायी चालत जाताना किंवा बस चुकल्यास ये जा करताना होणारी अडचण ही कोणी दूर करेनात. यामुळे त्या बाल चिमुकल्या शाळकरी मुलांना हातात बुट्टी, कुदळ घेऊन रस्त्यावरील चिखल हटवण्याची सुचलेली सुबुद्धी त्यांच्या कार्याचे कौतुक करणारी ठरले. आज शनिवारी शाळा सुटल्यानंतर काही बाल शालेय विद्यार्थी हातात कुदळ व बुटी घेऊन गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पुढे सरसावले. आपल्या वयाची तमा न बाळगता त्या बालकांनी काम करत असताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने गावातील शाळकरी मुलांना शालेय वस्तूचे वाटप करण्यासाठी जाणाऱ्या रणजीत पाटील, सुनील पाटील, विजय विश्रांत, पुंडलिक पाटील यांच्या निदर्शनाला आले. व त्यांनी तेथेच त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना त्याच ठिकाणी शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करून त्यांचे अभिनंदन केले. खरंतर, या श्रमदानात पाट्टये येथील बाल विद्यार्थी विनायक नार्वेकर, अनिल महाजिक, ओमकार डिगेकर, ईशान डिगेकर, बबन डिगेकर, पांडुरंग गावडे या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.