खानापूर / प्रतिनिधी : आमटे नजीकच्या एका जंगल रिसॉर्ट मधे बेळगाव च्या मुलाचा जो संशयास्पद ? मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. जांबोटी भागात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे रिसॉर्ट उभारले गेले आहेत. सदर रिसॉर्ट उभा करताना कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जातात का? हा प्रश्न निरुत्तरित आहे. दोन दिवसांपूर्वी आमटे येथे जलतरण तलावात बुडून एका बेळगाव खासबाग येथील महांतेश गुंजीकर नामक युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्याच्या जंगलपट्ट्यातील रिसॉर्ट चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा प्रकारे रिसॉर्ट उभारताना कायदेशीर बाबी खरोखर पूर्ण होतात का? हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे अशा प्रकरणासंदर्भात खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने त्या रिसॉर्ट ला परमीशन कोणी दिली ? सर्व रितसर परवानग्या आहेत का ? असा खानापूर तहसीलदारांना केला आहे.
खानापूर तालुक्याच्या पश्चिम व निसर्गरम्य वातावरणात अनेक रिसॉर्ट उभारण्यात आले आहेत. अशा रिसॉर्टमध्ये अनेक वेळा अवचित घटना घडण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. तरीही पोलिसांनी या संदर्भात अनेक वेळा मांडवल्या करून अशी छुपी प्रकरणे मिटवली आहेत. तरीही असे रिसॉर्ट बिनधास्त चालतात. याला वर्धहस्त कोणाचा हा प्रश्न या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.वास्तविक एखादा औद्योगिक व्यवसाय उभा करत असताना या संदर्भातल्या कायदेशीर व्हावी पूर्ण होणे गरजेचे आहे. रिसॉर्ट उभारणीसाठी लागणाऱ्या जागेची बिगर एन ए प्रक्रिया, जागे संदर्भात रीतसर परवाना या बाबी अत्यंत गरजेच्या ठरतात. ज्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी येथील एका रिसॉर्ट मध्ये जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाला. या रिसॉर्ट ची जागा एनए आहे का ? जागा एनए नसताना रिसॉर्ट उभे कसे राहिले ?
खानापूर पोलीसांनी या आमटे रिसॉर्ट ला याआधी कधी भेट दिली होती का ? तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का ? जिथे मुलगा बुडाला किंवा घातपात झाला हे पोलीस तपासात निष्पन्न होईलच परंतु स्विमिंग पूलाच्या ज्या सरकारी गाईडलाईन आहेत कोर्ट गाईडलाईन आहेत उदा. स्विमिंग पूलाची खोली किती असावी तिथे गार्ड असावा की नसावा ? वगैरे यासंदर्भात पोलीस गप्प कसे ? असा सवाल खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, तसेच महानतेस राऊत यांनी उपस्थित केला आहे.
खानापूर तालुक्यात किती रिसॉर्ट विनापरवाना आहेत ? सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत का ? अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहेत का ? सरकारी अधिकारी एवढे बेजबाबदार कसे वागू शकतात ? याप्रकरणची सखोल चौकशी व्हावी अशी खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस ची मागणी आहे. शिवाय बेळगाव खासबाग येथील मस गुंजकर यांच्या वडिलांना याबाबत न्याय द्यावा. कोणत्याही प्रकार ने या प्रकरणावर दबाव पडू नये याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी अशी मागणी ही खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.