खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: एकत्र बसून खाल्लेले डबे, निकालाच्या दिवसांची भीती, बोर्डाच्या परीक्षा, हातावर खाल्लेल्या छड्या, मैदानावर खेळलेले खो-खो कबड्डी चे डाव, मन पिळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरलेल्या त्या गोड आठवणी.. एकत्र करून चला…. घंटा वाजली.. पुन्हा एकदा शाळा भरूया! या उद्देशाने जेव्हा माजी विद्यार्थी एकत्र येतात,त्याचा आनंद हा द्विणित असतो. अशाच पद्धतीने तब्बल वीस वर्षाने मराठा मंडल बेकवाड हायस्कुल बेकवाडच्या 2003 – 04 च्या सालातील 10 वी ला असणा-या विद्यार्थांचे बुधवार दि: 6-11-2024 रोजी बेकवाड हायस्कुल च्या प्रांगणात स्नेह सम्मेलन तसेच आजी व माजी शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करून लहानपणीच्या आठवणी जागा केल्या. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याद्यापक श्री एन एल पाटील होते.. या कार्यक्रमाला प्राथमिक व हायस्कुल विभागातुन आजी व माजी शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तवन स्वागतगीतने झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटो पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थीनी प्रार्थना, राष्ट्रगीत गायीले. यानंतर प्राथमिक विभागातुन श्री डी एम भोसले, श्री जे बी देसाई, श्री जी एन कुट्रे , श्रीमती ए एम बीडीकर ,तसेच रामा होलिकोतली व हायस्कुल विभागातुन श्री के के धबाले, श्री एस एन बेडरे श्री आर एल पाटील, श्री एस बी घुग्रेटकर , श्री आर सी सावंत तसेच विद्यमान मुख्याद्यापक श्री पी एन मेलगे व इतर शिक्षकवृंद यांचा शाल श्रीफल व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यानंतर सर्व विद्यार्थीनी व शिक्षकानी मनोगत व्यक्त केले. बालपणीच्या आठवणी, उच्च शिक्षण घेता घेता जीवनात होणारे बदल, आयुष्याच्या चढउतारात गेलेले दिवस याच्या आठवणी देणारी अनेक आणि मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन पुंडलिक धबाले व दिपीका देसाई तसेच प्रास्ताविक रुपाली मडवालकर यांनी केल मुकेश जयराम पाटील संतोष पाटील परसराम केसरेकर पुंडलिक बाळेकुंद्रे ज्योतिबा विशेष परिश्रम घेतले
बाळकृष्ण, दीपक, ज्ञानेश्वर, प्रभाकर,विठ्ठल, विनायक, मष्णू, रवींद्र कृष्णाप्पा संतोष पाटील हे विद्यार्थी हजर होते
मंगल रूपाली खवरे पद्मावती, कांचना, माया, कांचना मडवालकर विद्या, सुनिता, रेखा, गोदावरी, श्रीदेवी , मनीषा, ज्योती या विद्यार्थिनी हजर होत्या. दुपारी स्नेहभोजन आभार प्रदर्शन कार्यक्रमाची सांगता झाली