IMG-20250202-WA0001

खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी :

मौजे आमटे येथे गणेश जयंती निमित्त नाट्य कार्यक्रम तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आमटे येथील श्री गणेश मंदिराच्या समोर गावकऱ्यांनी गणेश जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करून सांगता कार्यक्रम रात्री नाटकाचा कार्यक्रम आयोजित करून करण्यात आला. सदरी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष लक्ष्मण कासरेकर हे होते.

सदरी कार्यक्रमाला उद्देशून माननीय एडवोकेट ईश्वर घाडी तसेच काँग्रेसचे अध्यक्ष व वकील संघटनेचे अध्यक्ष यांचा शाल व श्रीफळ देऊन गणेश मंदिर ट्रस्टमार्फत सत्कार करण्यात आला.

सत्काराला उद्देशून बोलताना माननीय घाडी यांनी या भागातील विकासाबद्दल माननीय डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर ए आय सी सी सेक्रेटरी व माजी आमदार यांनी या भागात केलेल्या विकासाचा पाढा वाचला तसेच आमचे गावाला हायस्कूल व रस्त्याची सुविधा त्यांनी आपल्या आमदारकीच्या पिरेड मध्ये केली असे सांगून आत्ता पण काँग्रेस पक्षाच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या व जिल्हा पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या आदेशावरून ज्या पंच गॅरंटी योजना आहेत. त्याच्याबद्दल माहिती देऊन खानापूर तालुक्याला प्रति महिना सरकारकडून 18 ते 19 कोटी रुपयाचा निधी येतो. तसेच तालुक्यामध्ये पंच गॅरंटी योजनेसाठी तालुका पंचायत येथे गव्हर्मेंट नॉमिनेशन कमिटी नेमलेली असून आपले काही वरील योजना घेण्यासाठी महिलांना अडचणी येत असतील तर तालुका पंचायत खानापूर येथे येऊन समस्या निवारण करून घ्याव्यात गावचा विकास होत असताना ग्रामपंचायतीकडून अगर संबंधित जिल्हा पंचायत असो तालुका पंचायत असो कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण निंबाळकर यांच्या आदेशाखाली त्या मी एक काँग्रेस अध्यक्ष या नात्याने सोडविण्याचा प्रयत्न करीन तसेच आपण येथे गणेश मंदिर भव्य दिव्य बांधून सदरी मंदिराची स्वच्छता व महाप्रसाद आयोजित करून गेली दहा वर्षे आपण परमेश्वराचा आशीर्वाद घेत आहात व श्री गणेशाने आपल्या गावात सुख शांती समृद्धी नांदू देत असे मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. सदरी कार्यक्रमाला गावातील तसेच पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. सदरी कार्यक्रमाच्या वेळेला मंदिर समोर संगीत भजन म्हणण्यासाठी एडवोकेट घाडी यांनी उपस्थिती लावून संगीताचा आस्वाद लुटला व या कार्यक्रमाला पीएनडी बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील तसेच राठोड व त्यांच्या बँकेचे सर्व संचालक मंडळ व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते. सगळे कार्यक्रम रात्री नऊ ते बारा यावेळी झाला व त्याच्या नंतर नाट्यऱ्यांनी मंचाला सुरुवात झाली. खानापूर तालुका ग्रामपंचायत मेंबर युनियन अध्यक्ष व तालुका ट्रिब्युनल सदस्य विनायक मल्लाप्पा मुतगेकर तसेच निलावडा ग्रामपंचायत सदस्य हे उपस्थित होते

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us