खानापुर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारी अधिकारी जनता व्यापारी शिवाय निरपराध लोकांना धमकावून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह काही बनावट पत्रकारांच्या वर शनिवारी सायंकाळी एफ आय आर दाखल होऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्यांची 384 कलमाखाली कारागृहात परवानगी करण्यात आली आहे.
एका व्यक्तीने दिलेल्या लेखी तक्रारीवरून खानापूर पोलीस ठाण्यात भादंवि ३८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी गणेबैल, हातरगुंजी नाजिक एका बांबू व्यापाऱ्याला त्याच्या बांबूच्या मालासह पकडून या ब्लॅकमेलर्सच्या टोळक्याने धमकावून त्यांच्याकडून दोन लाखाची खंडणी मागितली होती. देण्यास नकार दर्शवल्याने त्या बनावट पत्रकारांनी त्यांना तगादा लावला होता. शेवटी सदर बांबू व्यापाराने 40 हजार रुपये देण्याचे कबूल केले व सापळा रचून त्यांच्याकडून पुरावा गोळा केला. व त्यांच्यावर खानापूर पोलिसात धमकी प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. यामध्ये दोन युट्युब चे बोगस पत्रकार तर दोन सामाजिक कार्यकर्ते असल्याचे समजते.
खानापूर जवळील गणेबैल/हत्तरगुजी केएफडीसी शासकीय बांबू मळ्यातून बांबूची अवैधपणे तस्करी होत असल्याचा आरोप करत ठेकेदाराला वारंवार धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याचे कळते. दरम्यान वन खात्याने या संदर्भात परिस्थितीची पाहणी करून दिलेल्या बाबत अधिकृत परवाना देऊन बांबू तोडण्यास सांगितले होते तरी हे आपण पत्रकार असल्याचे सांगून त्यांना वारंवार दबाव टाकून खंडणी होते . दोन लाख रुपये देऊन प्रकरण संपवा नाही तर प्रकरण पुढे नेऊ अशी पुन्हा त्या व्यापारला धमकी दिल्याने त्या व्यापाऱ्याने सापळा रचून त्या ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारांना 40 हजार रुपये खंडणी देण्याचे कबूलही केले व आपल्याकडे पुरावा ठेवून त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून काही बोगस पत्रकार अशा पद्धतीने लोकांची लुबाडणूक करून पैसे उकळण्याचा धंदा करत असल्याचे निदर्शनाला आले होते. गेल्या पंधरावड्यात काही ठिकाणी लाकूड व्यवसाय माती व्यवसाय हॉटेल व्यवसाय किंवा डॉक्टर व्यवसाय करणाऱ्याना अशी काही बोगस टोळी स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगून संपूर्ण खानापूर तालुक्याची खिल्ली उडवत असतानाही त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कोणीही बगावत नव्हते. अखेर या बांबू प्रकरणात ते अलगदपणे सापडले. पण यामध्ये अडकलेले हे स्थानिक असले तरी तालुक्याबाहेरील असे अनेक काही बोगस पत्रकार आहेत. त्यांच्यावर अशी कारवाई होणे अत्यावश्यक आहे. काल झालेल्या या प्रकरणी खानापूर तालुक्यातील चौघांच्यावर फौजदारी कसला दाखवून त्यांची कारागृहात परवानगी झाली आहे.
खुलासा! त्या बोगस पत्रकारांचा खानापूर पत्रकार संघटनेची संबंध नाही!
पैशाच्या खंडणीसाठी व्यवसायिकांसह लोकांची फसवणूक करणाऱ्या त्या बोगस पत्रकारांचा खानापूर तालुका पत्रकार संघटनेची कोणताही संबंध नसल्याचा खुलासा खानापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे, सचिव प्रसन्ना कुलकर्णी, उपाध्यक्ष वासुदेव चौगुले सह पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पत्रकारांच्या नावे लुबाडून करणाऱ्या त्या बोगस पत्रकारांच्या संदर्भात अनेक वेळा खानापूर तालुका पत्रकार संघटनेकडे तक्रारी आल्या. तालुक्यातील काही नवीन बोगस पत्रकार तसेच तालुक्या बाहेरील काही पत्रकार खानापुरात येऊन शासकीय अधिकाऱ्यांना धमकावणे, ग्रामपंचायतींना करून खंडणी उकळण्याचे प्रकार करत आहेत. यासंदर्भात तालुका पत्रकार संघटनेने बैठक घेऊन पोलीस निरीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना करून त्यांचा तालुका संघटनेची संबंध नसल्याचे सुचित केले होते. तरीही हा त्यांचा धंदा राजरोसपणे सुरू होता. या ब्लॅकमेलर्स पत्रकारांमध्ये केवळ खानापुरातीलच नव्हे तर तालुक्या बाहेरील अनेक जण येऊन अधिकाऱ्यांना वारंवार ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळण्याचा जणू धंदाच करत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीपासून व्यवसायिकात ह्या बोगस पत्रकाराबद्दल आसंतोष निर्माण झाला आहे. पण या प्रकरणात दोन सामाजिक कार्यकर्ते नाहक दोषी ठरल्याचे चर्चेत आहे.