IMG_20240101_110808
  • खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
  • बेळगाव -पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी खानापूर ते गुंजी दरम्यान नायकोल नजिक भरधाव ट्रक रस्त्यावरच पलटी झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. सदर ट्रक मधून लाकूड घेऊन जात असताना रात्री अंधाराच्या वेळी सदर ट्रक बाजूच्या दुभाजकाला आढळल्याने अपघात झाल्याचे कळते. सुदैवाने यामध्ये कोणती जीवित हानी झाली नाही. मात्र ट्रक रस्त्याबाजूला सुरू असलेल्या काँक्रीट कामावर पडल्याने ट्रकचे मात्र नुकसान झाले आहे. खानापूर रामनगर हा राष्ट्रीय महामार्ग अपघाताला निमंत्रण ठरत आहे. अर्धवट कामामुळे या रस्त्यावर नेहमी असे लहान-मोठे अपघात होत असताना प्रवाशांच्या जीवावर बेतेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धवट कामामुळे रस्त्यावरून जाताना पर्यायी वळणदार रस्ते करण्यात आल्याने असे अपघात घडत आहेत. यासाठी तातडीने हा रस्ता पूर्ण होऊन सुखकर प्रवासासाठी रस्ता पूर्ण करून द्यावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us