खानापूर : प्रतिनिधी ; एका दुचाकी स्वारकाने सर्विस रोड वरून चुकीच्या मार्गाने जाताना समोरून येणाऱ्या इकोस्पोर्ट कारला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव शशिकांत यल्लाप्पा मादार (वय 45 )रा. हेब्बाळ असे आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदर दुचाकी स्वार शशिकांत हा हेबाळकडून बेळगावला आपल्या दुचाकीवरून जात होता. करंबळ (गोवा क्रॉस )नजीक महामार्गावरील ओवर ब्रिजच्या उजव्या बाजूने असलेल्या सर्विस रस्त्यावरून चुकीच्या विरोधी दिशेने जाऊन फोर्ड कंपनीच्या इकोस्पोर्ट कारला ठोकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. बेळगावहून लोंढ्याच्या दिशेने जाणाऱ्या इकोस्पोर्ट कारला विरोधी दिशेने जाऊन जोराची धडक दिली. त्यामुळे तो जागीच ठार झाला. तर कार मधील एअर बॅग खुल्या झाल्याने कार मधील लोक किरकोळ जखमी झाल्याचे कळते. दरम्यान अपघाताची बातमी कळताच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्दैवी युवकांच्या नातेवाईकांना सांत्वन करून मृतदेह शवाविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला. या अपघातामुळे हेबाळ गावात एकच शोककळा पसरली आहे.