खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
बुधवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास खानापूर येथे सुस्त मस्त जेवण करून काटगाळी मार्गे बेळगाव मच्छे कडे निघालेल्या एका कारचालकाचे नियंत्रण तुटल्याने रस्त्याकडेला आले असलेल्या एका मोरीला जोराची धडक बसल्याने दोघे जागीच ठार झाले आहेत . यामध्ये असलेल्या पाच पैकी दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री दीडच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकांमध्ये मच्छे ता. बेळगाव येथील दोन युवकांचा समावेश आहे.
गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास सदर युवक खानापूर या ठिकाणी मौज मस्ती करून बेळगाव ला जाण्यासाठी खानापूर जांबोटी मार्गे रात्री दीडच्या सुमारास निघाले होते. असे समजते. दरम्यान खानापूर जांबोटी रस्त्यावरील रेल्वेओवर ब्रिजच्या रस्त्यावरून (सणाया गार्डन) सुसाट वेगाने धावणारी कार कुंभार नाल्यावर असलेल्या मोरीला जोरात धडकली त्यामध्ये त्या कारचा चक्काचूर झाला असून यामध्ये असलेल्या पाचही जणांना गंभीर दुखापत झाली यापैकी दोघेजण जागीच ठार झाले आहेत. तर आणखी काही गंभीर असल्याचे कळते.
अपघातात पार झालेले युवक…..
या अपघातात मच्छे येथील शंकर (मिथुन) मोहन गोमानाचे (वय 25) व आशिष मोहन पाटील (वय 26) मुळगाव हत्तरवाड खानापूर, सध्या राहणार मच्छे, हे दोघेजण जागीच ठार झाले. तर या अपघातात निकेश जयवंत पवार (वय 25) मच्छे, याचा पाय गुडघ्यातून मोडला असल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्यासाठी त्याला बेळगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात चालकाच्या बाजूला बसलेला जोतिबा गोवींद गांवकर (वय 27) मच्छे, हा किरकोळ जखमी झाला आहे.