Screenshot_20230421_081757


खानापूर/ प्रतिनिधी:;
एकीकडे हेस्कॉम खात्याकडून रात्रीच्या वेळी थ्री फेज वीज पुरवठा त्यात जंगली हिस्त्र प्राण्यांचा त्रास यामुळे शेतकऱ्यांना पिके जगवताना कसरत होत आहे. अशातच रात्रीच्या वेळी शेतवडीत पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या व हीच तर प्राण्यांच्या धास्तीने एकत्रित येऊन रस्त्याच्या बाजूला बसलेल्या शेतकऱ्यांना एका अज्ञात वाहनाने ठोकरल्याने तिघजण ठार, , एक किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री खानापूर तालुक्यातील गोधोळी येथे घडली आहे.

या अपघातात ठार झालेल्या शेतकऱ्यांचे नाव महाबळेश्वर शिंदे (वय वर्षे 65) व पुंडलिक रेडेकर (वय 72 वर्षे) असे आहे. तर या अपघातात तर पुंडलिक यांचे सख्खे भाऊ कृष्णा रेडेकर हे गंभीर जखमी असल्याने त्यांना बेळगाव येथील के एल ई हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले होते. त्यांचाही उपचारअभावी रुग्णालयात मृत्यू झाला, तर अन्य एक जण किरकोळ जखमी झाला आहे,
याबाबत मिळालेली माहिती की, गोधोळी परिसरात अस्वलांसह जंगली प्राण्यांचा धुमाकूळ कायम आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी होणारा वीजपुरवठा त्रासदायक ठरला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी रात्रीच्या वेळी एकत्रित येऊन शेततळीकडे जात असतात. अशाच प्रकारे गुरुवारी रात्री जवळपास पाच ते सहा शेतकरी एकत्रित आले होते. रात्री बाराच्या सुमारास शेतात बोरलवेलचे पाईप बदलून हुबळी गोवा या राज्यमार्गावर रस्त्याच्या बाजूला पान सुपारी खात बसले असताना गोव्या कडून हुबळीकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात वाहनाने जोरात ठोकून तेथून पोबारा केला आहे. दोघ जण जागीच ठार व तरी एक जण बेळगाव येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने या अपघातात तिघांचा बळी गेला आहे. तर एक गंभीर जखमी झाल्याने एकच आक्रोश निर्माण झाला.बघता बघता ही बातमी गावात पसरली व तातडीने जखमी सह मृत झालेल्या व्यक्तींना खानापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या बाबतची बातमी माजी आमदार अरविंद पाटील यांना  पहाटे समजताच रुग्णालयाकडे जाऊन जखमींची विचारपूस केली. सदर शेतकऱ्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us