खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: केरळच्या वायनाडमध्ये जीप दरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण केरळ राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या वायनाडमध्ये (Mananthavady) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जीप चालकाचाही मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर झाले आहे
या अपघातात मृत्यू झालेल्या 6 जणांची ओळख पटली आहे. राणी, संती, चिन्नम्मा, लीला, राबिया आणि शीजा अशी मृतांची नावे समोर आली आहेत. हे सर्वजण थलप्पुझाजवळील मक्कीमाला येथील राहणारे आहेत. तत्पूर्वी, या भीषण अपघातातील जखमींना उपचारासाठी वायनाड येथील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. थविंजल पंचायत अध्यक्ष एल्सी जॉय आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी मतांची पष्टी केली.