खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: दिसूर अल्मा फॅक्टरी जवळ शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दुचकीची ट्रकला धडक बसल्याने शिवोलीचा युवक ठार झाला. तर त्याच दरम्यान दुसरीकडे खानापूर तालुक्यातील पारिश्वाड नजीक आणखी एक अपघात झाल्याने 24 वर्षीय युवक ठ ार झाल्याची घटना घडली आहे.
खानापूर तालुक्यातील तालुक्यातील पारीश्वाड नजीक पारिश्वावाड -खानापूर रस्त्यावर तलावा नजीक रात्रीच्या सुमारास दुचाकीला झालेल्या अपघात कामशीनकोप येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सदर युवकाचे नाव विठ्ठल गीड्डापणावर असे आहे. सदर युवक आपल्या दुचाकीवरून पारिश्वाड हून आपल्या गावाकडे जात असता अज्ञात वाहनाच्या ठोकरित तो ठार झाल्याचे कळते. घटनास्थळी खानापूर पुणे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक एम. गिरीश यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.