
खानापूर लाईव्ह/ प्रतिनिधी: खानापुरचे लोककलावंत शाहीर श्री अभिजीत कालेकर यांना तेजस बहुद्देशीय संस्थेचा ” राज्यस्तरीय कला साधना पुरस्कार 2025 ” देवून सन्मान सन्मान करण्यात आला.
प्रतिवर्षी तेजस बहुद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने देण्यात येणारा ” राज्यस्तरीय कला साधना पुरस्कार 2025″ हा पुरस्कार खानापूरचे लोककलावंत शाहीर श्री अभिजीत कालेकर यांना श्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे रवीवारी दुपारी सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमाला सिने दिग्दर्शक, श्री अशोक कपूर, मेघा डोळस, व अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. श्री अभिजीत कालेकर हे एक लोक कलावंत म्हणून खानापूर तालुक्यातच नव्हे तर बेळगाव जिल्ह्यात परिचित आहेत. त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून रसिकांची मनी जिंकली आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.