खानापूर अबकारी निरीक्षकासह पाच कर्मचारी निलंबित
बेळगाव : अबकारी खात्याच्या एका पथकाने जप्त केलेल्या गोवा बनावटीच्या दारूच्या बॉक्सची परस्पर विक्री करून वरिष्ठ अधिकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना चकवा देण्याच्या प्रयत्न करणाऱ्या अबकारी निरीक्षकासह पाच कर्मचाऱ्यांच्या वर निलंबनाची कारवाई झाली आहे.
सदर प्रकारामुळे कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला असून अबकारी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा मोठा धक्का घेतला आहे. या प्रकरणाबाबत हकीकत की, खानापूर तालुक्यातील मोदेकोप जवळ गेल्या 7 मार्च रोजी एका बारा चाकी कंटेनर मधून बेकायदेशीर करण्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या 753 इम्पिरियल ब्लू व्हिस्की बॉक्सची जप्ती केली होती. परंतु सदर जप्त केलेल्या बॉक्स पैकी 301 बॉक्स परस्पर विक्री करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना केवळ 452 बॉक्स जप्त केल्याची नोंद दर्शवून अबकारी खात्याला चकवा देण्याचा प्रकार करणाऱ्या खानापूर अबकारी निरीक्षक सह पाच जनावर निलंबना होण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी खानापूर अबकारी निरीक्षक दावल साहब शिंदोगी, उपनिरीक्षिका पुष्पा गडादी, सदाशिव कीर्तीसह पाच जणांचा समावेश आहे.
सध्या कर्नाटकच्या सीमावरती भागात अवैध दारू वाहतुकीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकेबंदी हाती घेण्यात आली आहे. अबकारी खात्यानेही करडी नजर ठेवून एका विशेष पथकाची जांबोटी रोड हेमडगा रोड आदी भागात नाकेबंदी केली आहे. विशेष पथकाच्या नजरेत गेल्या 7 रोजी बारा चाकी कंटेनर मधून चोरटी वाहतूक होणारी जवळपास 753 इम्पेरियल व्हिस्की दारू बॉक्स पकडण्यात आले होते. परंतु सदर जप्त करण्यात आलेली चोरटी दारू अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यानीच पुन्हा चोरी करून केवळ 452 बॉक्स जप्त केल्याची खोटी माहिती व नोंद केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने जिल्हा अबकारी अधिकारीनी पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.