खानापूर /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री विठ्ठल सोमना हलगेकर यांची निवड भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजप नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील हे नाराज झाले आहेत ,पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी देण्याचे आमिश दाखवून पक्षात करून घेतले होते. पण ऐनवेळी त्यांना उमेदवारी डावल्याने अरविंद पाटील व त्यांचे अनेक समर्थक कार्यकर्ते नाराजीत आहेत. त्यामुळे अरविंद पाटील निवडणुकीपूर्वी नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे
मंगळवारी रात्री भाजपची उमेदवारी विठ्ठल हलगेकर यांना जाहीर होताच हजारो समर्थक कार्यकर्त्यांनी अरविंद पाटील यांची मनधरणी करून नाराजी व्यक्त करत अरविंद पाटील यांना समर्थन केले. पण अरविंद पाटील यानी बुधवारी खानापुरात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सबुरीची भूमिका घेत दोन दिवसात वरिष्ठांची चर्चा करून निर्णय घेण्याचे सांगितले होते. परंतु या बाबीला 5 दिवस उलटले तरी अद्याप माजी आमदार अरविंद पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. दरम्यान रविवारी भाजपा उमेदवार विठ्ठल हलगेकर तसेच भारतीय जनता पार्टीच्या मंडळ पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार अरविंद पाटील यांची भेट घेऊन मनधरणी करून त्यांना भाजपातच राहून पक्षाचा आमदार करण्यासाठी मौलाची भूमिका बजावावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे अरविंद पाटील नेमकी आपली भूमिका काय घेणार याकडे खानापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
खरं तर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी सह भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी अमिषाचे गाजर दाखवत माजी आमदार अरविंद पाटील यांना भाजपात समावेश करून घेतले होते. पण सवदींनाचं भाजपची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी काँग्रेसची साथ धरली आहे व उमेदवारी ही मिळवली, पण इकडे माजी आमदार अरविंद पाटील यांची व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांनी किंचितही कदर केली नाही, ही खेदाची बाब आहे. अशा परिस्थितीत अरविंद पाटील यांनाही भाजप सोडून काँग्रेसात समाविष्ट होण्यासाठी गळ घालण्यात आल्याचे समजते. पण अरविंद पाटील यांनी आपल्या राजकीय भविष्याचे गणित लक्षात घेता स्तब्ध व शांतपूर्वक निर्णय घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात माजी आमदार अरविंद पाटील हे भाजपातच राहून पक्षाचा आमदार करण्यासाठी झटणार? की अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे