
खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:
खानापूर मलप्रभा नदी घाटावरील मलप्रभा नदीच्या पत्रात एक वीस वर्षीय तरुण बुडून मृत्यू पावल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दुर्दैवी युवकाचे नाव समर्थ मल्लाप्पा चौगुले वय 20 रा. मन्नूर ता. बेळगाव असे आहे. तब्बल तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर सदर युवकाचा मृतदेह सायंकाळी पाच वाजता हाती लागला.
याबाबत हकीकत की बेळगाव तालुक्यातील मन्नूर येथील चौगुले परिवारातील कुटुंबीय सौंदत्ती यल्लमा देवीची यात्रा संपल्यानंतर खानापूर येथे मलप्रभा नदीच्या घाटावर परडी भरण्यासाठी आले होते. दरम्यान कुटुंबातील लोकांनी आंघोळी करून पूजा काम सुरू करत असताना समर्थ हा अंघोळ करण्यासाठी नदीच्या पात्रात उतरला. पोहता पोहता तो अचानक बुडाला. तो बाहेर आलाच नाही. दरम्यान घरची मंडळी ही त्या ठिकाणी उपस्थित होती. तो बुडत असल्याचे पाहूनही त्याला वाचवण्यासाठी त्यांची धडपड यशस्वी ठरली. सध्या नदीच्या पात्रातील पाणी अडवण्याच्या बंधाऱ्यात भरपूर पाणीसाठा आहे पाणी अडवण्यात आल्याने घाटावरील पायऱ्या ही बुडाले आहेत. अशामध्ये समर्थ हा चांगला पोहता येत नसतानाही त्या ठिकाणी पाण्यात उतरला, त्याला पाण्याचा अंत लागला नाही. त्यामुळे तो बुडाला लागलीच खानापूर पोलीस ठाण्यात व अग्निशामक दलाला पाचारण करून त्या समर्थचा मृतदेह शोधाशोध केला. तब्बल तीन ते चार तास मृतदेह पाण्यात शोधूनही मिळाला नाही, अखेर सायंकाळी पाच वाजता एन डी आर एफ दलाच्या जवानांनी त्या युवकाचा मृतदेह पाण्यातून शोधून काढला. तो मनुर येथील अशा कार्यकर्त्या व एलआयसी एजंट आशा चौगुले यांचा चिरंजीव असल्याचे समजते. त्याच्या दुर्दैवी निधनामुळे मनोर गावात एकच शोककळा पसरले आहेत