खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
सुसाट वाऱ्यामुळे करंबळ गावच्या वेशीत करंबळ, जळगा -चापगाव रस्त्यावर नुकताच रात्री नऊच्या दरम्यान एक झाड तुटून पडल्याने चापगाव रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे जळगा चापगाव भागातील नागरिकांना लालवाडी मार्गे प्रवास करावा लागला. खानापूर तालुक्यात सुसाट वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू झाल्याने नदी, नाले तुडुंब वाहत आहेत. अशा मध्ये अनेक ठिकाणी झाडे तुटून पडत आहेत. त्यामुळे अनेक जोड रस्ते बंद होत आहेत.
करंबळ गावच्या वेशीत गिरणी जवळ एक निलगिरीचे झाड तुटून पडल्याने विद्युतवाहिनांवर पडले. त्यामुळे करंबळ गावातील विद्युत पुरवठा पूर्ण टप झाला आहे. सदर घटनास्थळी तातडीने हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून सदर झाड हटवण्यासाठी प्रयत्न केला किमान दोन तास तरी सदर झाड हटवण्यासाठी लागतील त्यामुळे या मार्गावरील वाहतूक रात्री काही वेळ बंद असेल.