
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
सोमवारी दुपारी सुसाट वाऱ्यासह जोराचा पाऊस खानापूर तालुक्याच्या विविध भागात झाला. सुसाट वाऱ्यामुळे करंबळ गावच्या वेसित खानापूर नंदगड मार्गावर एक भले मोठे वृक्ष कोसळल्याने खानापूर नंदगड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, सायंकाळी 4:15 च्या दरम्यान झाड कोसळताच गावातील अनेक नागरिक या ठिकाणी स्वखशिने येऊन रस्त्यावर झालेली अडचण दूर केली. या संदर्भात वनखात्याला माहिती देण्यात आली होती. मात्र वन खाते येण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी हा रस्ता मोकळा केला मात्र तब्बल तासभर या मार्गावरून वाहतूक ठप्प झाली होती.