
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
व्यवसाय निमित्त छत्तीसगड येथे वास्तवात असलेल्या खानापूर तालुक्यातील बेकवाड येथील संभाजी शिवाजी आंबेवाडकर( वय वर्षे 58) यांचे शुक्रवारी दुपारी तीन वाजता छत्तीसगड येथे हृदयविकाराने निधन झाले. नेसले कंपनीत वाहन चालक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून कामाला होते. काल ऑन ड्युटी असताना त्यांना वाहनातच हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पक्षात आई वडील,पत्नी एक विवाहित मुलगी, एक चिरंजीव, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह रविवारी पहाटे बेकवाड येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता अंत्यविधी होणार आहे.