खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- सीमा भागातील मराठी भाषकांचे अस्तित्व कमी होत चालल्याने आता मराठी माणसाने आपले अस्तित्व राखण्याची गरज आहे. लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकात महाराष्ट्र एकीकरण समितीने रणांगणात उभे राहून निवडणूक लढवली असती तर आपली ताकत वाढली असती. भाषा जिवंत राहील आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवारी दिली नाही. पण ती काळाची गरज होती. कारभार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी निरंजन सिंह सरदेसाई यांनी केलेले हे धाडस कौतुकास्पद असून तालुक्यातील मराठी माणसाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येकाची जबाबदारी बनली असल्याचे विचार माजी सभापती मारुती परमेकर यांनी व्यक्त केले. रविवारी खानापूर येथील शिवस्मारकात महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
- या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात विचार विनिमय करण्यात आले. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत सदस्य विलास बेळगावकर म्हणाले, समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन भाषेसाठी जागृती कायम ठेवणे गरजेचे आहे. मराठी भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी स्वईच्छने निवडणूक लढवण्याचे तयार झालेल्यां निरंजन सरदेसाई यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहणं प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे विचार त्यांनी यावेळी मांडले. सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करून आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत समितीने निवडणका लढवणे गरजेचे होते पण याकडे दुर्लक्ष झाल्याने मराठी माणूस पक्षीय बळाला पडला आहे. आपल्या मराठी माणसाला एकत्रित आणण्यासाठी या निवडणुका गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तुम्ही लढ म्हणा मी लढायला तयार.. निरंजन सरदेसाई
- यावेळी बोलताना निरंजन सरदेसाई म्हणाले ,समितीचे अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक आपण लढवत आहोत. मराठी जन माणसापर्यंत आपण पोहोचून आपला समाज एकसंघ राखण्यासाठी आपले कर्तव्य आहे. मराठी माणसाने फक्त लढ म्हणा मी लढायला तयार आहे. म्हणूनच आपण हे धाडसाचे पाऊल उचलले असून कोणी, काहीही म्हणो महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार म्हणून या निवडणूक रिंगणात आपण राहणार आहोत. तेव्हा सर्व मराठी भाषिकांनी समितीच्या पाठीशी राहून एकजुट दाखवावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून बोलताना गोपाळ देसाई यांनी समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई 15 एप्रिल रोजी आपला निवडणूक अर्ज भरणार आहेत. शिवाय नवहिंद सोसायटीच्या कार्यालयाजवळ समितीचे कार्यालय लवकरच उद्घाटन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तेव्हा सर्वांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य ्य जयराम देसाई, राजाराम देसाई, जी एल हेब्बळकर,बाळासाहेब शेलार,खजिनदार संजय पाटील आदींनी विचार मांडले. यावेळी समितीच्या उमेदवारांना काहींनी देणग्याही जाहीर केल्या. शेवटी आभार कृष्णा कुंभार यांनी मांडले.