खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: पारवाड ता. खानापूर विश्व शांती दूत श्री श्री श्री सदगुरु पारवडेश्वर मठात सलाबाद प्रमाणे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात दि 14 डिसेंबर रोजी साजरा होत असून, समारोप 15 डिसेंबर ला होईल. या उत्सव काळात दि 10 डिसेंबर पासून गुरु चरित्र पारायण श्री कीर्तिकुमार कुलकर्णी यांचे होणार असून दत्त जन्मोत्सव दि 14 डिसेंबर रोजी दुपारी साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी श्री कैलाशजी महाले प्रभारी अधीक्षक धर्मादाय आयुक्तालय मुंबई तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री बाळासाहेब अमराळे पुणे, श्री विठ्ठल हलगेकर आमदार खानापूर व डॉ अंजली निंबाळकर माजी आमदार उपस्थित रहाणार आहेत. तसेच दि 15 डिसेंबर रोजी दत्त याग होईल आणि कार्यक्रमांची सांगता होईल.
मठाधीपती श्री श्री श्री भाऊंमहाराज यांनी सांगितले कि या उत्सवाच्या निमित्ताने जगाच्या कानकोपऱ्यातून हजारो भाविक भक्त श्री क्षेत्र सुवर्ण धाम पारवड या अतिशय पवित्र तपो भूमीत उपस्थिती दाखवतात. या वर्षी ही भजन, दिंडी, पालखी तसेच महाप्रसाद व आशीर्वाद याचा लाभ भाविक भक्तांनी उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगांव येथे कर्नाटक राज्य हिवाळी अधिवेशन चालू असून अनायसे शनिवार व रविवार असल्या मुळे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून काही मंत्रीगण उपस्थिती रहाणार असल्याच सद्गुरु भाऊ महाराज यांनी सांगितले.