खानापूर: तालुका डॉक्टर असोसीएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या सौजन्याने रविवारी दि ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यत समर्थ इंग्लिश मिडीय स्कूल मारूती नगर खानापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी शिबीराला आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार, सेक्रेट्ररी एआयसीसी डॉ. अंजली निबाळकर, माजी आमदार अरविंद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी ड किवडसन्नावर, डॉ. नारायण वड्डिन्नवर आदी निमंत्रित करण्यात आले आहे.
शिबीरासाठी तज्ञ डॉक्टर ! पंधरा रोगांवर होणार निदान!
डॉ. संतोष हजारे पोट विकार, डॉ. देवदत्त देसाई जनरल फिजिशयन, डॉ रोहित जोशी सर्जन, डॉ संतोष शिंदे त्वचा रोगतज्ञ, डॉ. महेश कल्लोळी कर्क रोगतज्ञ, डॉ. प्रविण जैन संधीवात विकार तज्ञ, डॉ दिपक पुजार हृदय विकार तज्ञ, डॉ. विनायक पाटील बाल रोग तज्ञ, डॉ. संदिप चिंदी मेंदू विकार तज्ञ, डॉ. दत्तप्रसाद गिजरे, डॉ. हर्षद सुतार कान, नाक, घसा तज्ञ, डॉ. किरणकुमार पुजार श्वास कोष तज्ञ, डॉ. देवेगौडा अस्थीरोग तज्ञ, डॉ रितेश वेर्णेकर किडणी रोग तज्ञ, डॉ अभय पट्टाडे मुत्र रोग तज्ञ आदी तज्ञ डॉक्टर तपासणीसाठी येणार आहेत.
आरोग्य तपासणीला येताना आयुष्यमान भारत स्कीम रजिस्ट्रेशनसाठी लागणारे रेशनकार्ड, आधार कार्ड लिंक मोबाईल आणावे. व आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा. असे आवाहन खानापूर तालुका डॉक्टर असोसीएशन अध्यक्ष डॉ. डी ई. नाडगौडा, उपाध्यक्ष डॉ एस के कुंभार, सेक्रेट्री डॉ. सागर नार्वेकर, खजिनदार डॉ. किरण लाड यानी केले आहे