खानापूर
ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान, खानापूरतर्फे 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टप्यातील व्याख्यानमालेचे आयोजन 8, 15 आणि 22 डिसेंबर रोजी करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध अभियंते (पुणे) पिटर डिसोझा आणि कार्यकारी अध्यक्ष व निवृत्त मुख्याध्यापक बी. जे. बेळगावकर यांनी दिली आहे. व्याख्यानमालेचे हे 17 वे वर्ष, यावर्षी ही व्याख्यानमाला एकाच वेळी 8 केंद्रावर होणार आहे. यापैकी हलशी, नंदगड, जांबोटी, इदलहोंड आणि चापगाव यां खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमातील आणि देवलती, नंदगड आणि गंदिगवाड कन्नड माध्यमातील विद्याव्याँसाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेच्यावेळी मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान आणि कन्नड (द्वितीय भाषा) विषयांच्या तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत
कन्नड माध्यमांच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व इंग्रजी (द्वितीय भाषा) तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. खानापूर तालुक्या व्यतिरिक्त बेळगाव आणि हुक्केरी तालुक्यातही व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर, किणये, बेनकनहळ्ळी व हुक्केरी तालुक्यातील दड्डी केंद्रावरही व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
बारा केंद्रांवर हजारो विद्यार्थी लाभ उठविणार
व्याख्यानमालेच्या पहिल्या टप्यातील 12 केंद्रांशी संलग्न असलेल्या अनेक माध्यमिक शाळांचे हजारों विद्यार्थी लाम उठविणार आहेत, असे स्पष्ट करून डिसोझा आणि बेळगावकर पुढे म्हणाले, व्याख्यानमालेच्या दुसऱ्या टण्याचे म्हणजेच प्रज्ञावंत व्याख्यानमालेचे आयोजन 19 जानेवारी व 2 आणि 10 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे या व्याख्यानमालेला वेगवेगळ्या माध्यमिक शाळांचे निवडक विद्यार्थी हजेरी लावणार आहेत.
व्याख्यानमालेच्या वेळी एसएसएलसी विद्यार्थ्यांना तीन ऐवजी सर्व सहा विषयांचे तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या टप्यातील व्याखनमाला खानापूर येथे होणार आहे. वेगवेगळ्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या साहाय्यक शिक्षकांच्या आणि रीसोर्स पर्सन्सच्या सहकार्याने गेली 16 वर्षे यशस्वीपणे हाती घेण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेला मोठ्या संख्येने हजर राहून यावर्षीही यशस्वी करा, असे आवाहन पुढे डिसोझा आणि बेळगावकर यांनी केला आहे. दरम्यान व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल होसूर, एम. डी. पाटील, एन. एम. देसाई, उद्योजक शिवाजी जळगेकर, मुख्याध्यापक एस. पी. घबाडे, शिक्षक प्रमोद आळवणी, मुख्याध्यापक महेश संडेकर, निवृत प्राचार्य पी. के. चांपगावकर, निवृत्त शिक्षक संजीव वाटूपकर आणि मनोहर होनगेकर आदी परिश्रम घेत आहेत.