खानापूर लाईव्ह न्यूज/ तोपिनकट्टी हून लोकोलीकडे दुचाकीवरून येत असताना झालेल्या अपघातात तोपिनकट्टी येथील नागराज पुंडलिक तीरवीर वय वर्ष 20 हा युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे.
खानापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर मृत युवक रविवारी सायंकाळी तोपीनकट्टी-लोकोळी कत्री मार्गावरून आपल्या गावी तोपीनकट्टी जात असताना, ट्रॅक्टर ट्रॉलीला साईड मारण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ट्रॅक्टर चालक असलेली २० वर्षीय युवती वैष्णवी बसवानी होसुरकर आणि युवक यांच्यात साईड मारण्याच्या प्रयत्नात वाहन चालवताना दोघांनीही निष्काळजीपणाने वाहन चालवलं, आणि त्यामुळे नागराज पुंडलिक तीरवीर याची दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. या धडकेत युवक दुचाकीसह रस्त्यावर पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या अपघाताच्या संदर्भात खानापूर पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक आणि पोलिस उपनिरीक्षक गिरीश एम. यांच्यासह अधिक तपास सुरू आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृत युवकाचा मृतदेह सोमवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.