IMG-20241123-WA0055

खानापूर:

  मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय  खानापूर या नामांकित  पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले होते  आता बैलहोंगलमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेतही विशेष यश संपादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 
  2024-25 शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा बैलहोंगल या ठिकाणी घेण्यात आल्या. बेळगाव जिल्हास्तरीय सांस्कृतिक विभाग स्पर्धेत अतंरगत इंग्रजी निबंध स्पर्धेत पाच तालुक्यातील पहिल्या क्रमांकाच्या प्रतिभावंत विद्यार्थिनी भाग घेतलेला होता. या अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या निबंध स्पर्धेत मं मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील कुमारी समृद्धी शंकर पाटील या स्पर्धक  विद्यार्थिनीने  प्रथम क्रमांक मिळविला. 
या स्पर्धेची तिव्रता ओळखून कुमारी समृध्दी शंकर पाटील हीने सरावासाठी बरीच मेहनत घेतली होती. या मेहनतीचे तिला छान फळ मिळाले असून तिने न कळत मराठा मंडळ संस्थेचे नावही उज्ज्वल केले आहे. 
 कुमारी समृद्धी पाटील हीच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी 
मराठा मंडळ संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू (हलगेकर)यांनी दुरधवणीद्वारे विशेष कौतुक केले असून  ज्येष्ठ संचालक श्री. परशराम गुरव, संचालक श्री. शिवाजीराव पाटील यांनीही तिचे अभिनंदन केले आहे. तसेच इंग्रजी विषयाचे अभ्यासक व कॉलेजचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील यांचे तिला मार्गदर्शन मिळाले आहे. शिवाय प्रा. मनिषा यलजी, प्रा. आरती नाईक, प्रा नितीन नाईक, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा नागेश सनदी व काॅलेजच्या सर्व प्राध्यापक वर्गाने तिला वेळोवेळी मौलिक सूचना केल्या असून या प्रसंगी  उपस्थित राहून माजी विद्यार्थिनी म्हणून उपस्थित राहिलेल्या प्राचार्या शरयू कदम, शामल पाटील, प्रमिला राव यांनी विशेष अभिनंदन केले. बेळगाव जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. म्हणून तिचे विशेष कौतुक होत आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us