खानापूर:
खानापूर तालुका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य, व तालुक्यातील उचवडे येथील प्रतिष्ठित नागरिक श्री लक्ष्मण बारकू बामणे यांच्या धर्मपत्नी व बैलूर ग्रामपंचायतीच्या माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्या श्रीमती अनुसया लक्ष्मण बामणे वय ४५ यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा अंत्यसंस्कार सकाळी 11 वाजता होणार आहे.
श्रीमती अनुसया लक्ष्मण बामणे यांनी ग्राम पंचायतीच्या मागील अडीच वर्षाच्या काळात बैलूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळवी. त्या सध्या विद्यमान सदस्य देखील आहेत. तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे यांच्या राजकीय प्रवासात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. प्रतिकूल परिस्थितीतून संसाराचा रणगाडा आखण्यात त्या जीवनात यशस्वी झाल्या. त्यांना अल्पशा आजाराने घेरले होते. प्रकृतीत सुधारणा होत असतानाच रात्री एकच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कळते. त्यांच्या आकस्मित जाण्याने बामणे परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना देवत हीच ईश्वरचरणी प्रार्थना व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.