खानापूर : हल्ली शेती उत्पादनाचे व्यापारीकरण जोरात सुरू आहे. लहान मोठ्या कंपन्या जास्त नफा मिळविण्यासाठी तसेच उत्पादन जास्त दिवस टिकण्यासाठी रसायन मिश्रित भेसळयुक्त खाद्यपदार्थ निर्मितीकडे कल वाढला आहे. जाहिरातबाजी, आकर्षक पॅकिंग आणि कमी किमती पाहून सामान्य नागरिक हे खाद्यपदार्थ खरेदी करून विविध आजारांना आमंत्रण देत आहेत. त्यामुळे भेसळमुक्त सेंद्रिय खाद्यपदार्थ खरेदी करण्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. नागरिकांनी भेसळमुक्त सेंद्रिय उत्पादने दैनंदिन जीवनात वापरात आणून स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घ्यावी, असे मत श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर यांनी व्यक्त केले. चौगुले पाटील ॲग्रो इंडस्ट्रीजच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
खानापूर येथील भोसगाळी-कुटीन्होनगर येथे चौगुले पाटील ॲग्रो इंडस्ट्रीजच्या गुऱ्हाळचे उद्घाटन रविवार दि. 17 रोजी खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पदक आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी हे होते.
मानसिंग शिवाजीराव पाटील, अध्यक्ष खानापूर म. ए. समिती गोपाळराव देसाई, लैला शुगरचे एम.डी सदानंद मारुतीराव पाटील, जनरल मॅनेजर लैला शुगर बाळासाहेब महादेव शेलार, खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष आय. आर. घाडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर गणेश पूजन श्री. नारायण रामा चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले तर “चौगुले पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज” नामफलकाचे अनावरण रमाकांत कोंडुसकर आणि माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर ऊस गाळप कार्याध्यक्ष खानापूर म. ए. समिती मुरलीधर गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. स्मितल प्रदीप पाटील यांनी तर उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन सौ. शिवानी पाटील यांनी केले.
यावेळी श्री. प्रकाश विठ्ठलराव चव्हाण, जयराम देसाई, नगरसेवक विनोद दत्तात्रय पाटील, धनंजय यशवंतराव देसाई, यशवंत लक्ष्मणराव बिरजे, गोपाळ मुरारी पाटील, सचिन हेमंत साळगावकर, पांडुरंग तुकाराम सावंत, विवेक गिरी, डी. एम. भोसले, सुहास हुद्दार, कल्लाप्पा पाटील, प्रमोद मनेरीकर, बाळू चोर्लेकर, तुकाराम देसाई, अमर जोरापुरे, पिराजी कुऱ्हाडे, रवी काडगी, वासू बापू चौगुले, ॲलेक्स सोझ, पुंडलिक रामचंद्र पाटील, विश्वास शिवाजी पाटील, निळू बेड्रे, मष्णू गुरव, माऱ्याप्पा पाटील, वसंत पाटील, लक्ष्मण पाटील, मुकुंद पाटील, रामचंद्र खांबले, रमेश पार्सेकर, बाजीराव पाटील, पुंडलिक पाटील, गणपती पाटील, राजाराम पाटील, निरुपती कांबळे, नारायण पेडणेकर, संतोष देवलकर, चंद्रकांत कोंडूस्कर, शेखर पाटील, किरण हुद्दार यांच्यासह खानापूर तालुका व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.