खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुका ही माझी जन्मभूमी आहे. या तालुक्याने आपणाला विधान परिषद सदस्य बनवण्यासाठी दिलेले योगदान मला अविस्मरणीय आहे त्यामुळे मी खानापूर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. विधान परिषद सदस्य या नात्याने या तालुक्यात जास्तीत जास्त निधी आणून त्या अंतर्गत विकास कामे राबवण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. तालुक्याच्या विविध गावात 59 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. करंबळ या ठिकाणी यात्रेपूर्वी ग्रामपंचायत कमिटी तसेच पंच कमिटीने येऊन विकास कामाची मागणी केली होती पण त्यावेळी आपल्याकडे फंडाची कमतरता असल्याने वेळीच काम करणे शक्य झाले नाही. पण येथील जनतेने केलेल्या मागणीची दखल लक्षात घेता या गावासाठी आपण मलनाडू प्रदेश विकास योजनेअंतर्गत 25 लाखाचा निधी मंजूर केला असून यापैकी प्राथमिक टप्प्यात 15 लाखाचा फेवर्स होळी चव्हाटा देवस्थान पासून मारुती मंदिर पर्यंत कामाचा आज शुभारंभ करत आहोत. उर्वरित निधी जानेवारीनंतर या ठिकाणी मार्गी लागेल यासाठी दहा लाख राखीव ठेवण्यात आले असून यामधून समुदाय भवनाची निर्मिती केली जाईल. असे प्रतिपादन विधान परिषद सदस चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केले. ते करंबळ येथे आपल्या फंडातून मंजूर केलेल्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजाराम नागाप्पा पाटील होते.
प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य नारायण पाटील यांनी करून करंबळ गावच्या विकासासाठी आपण ग्रामपंचायत सदस्य या नात्याने वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. गेल्या अडीच तीन वर्षात ग्रामपंचायत मार्फत अनेक विकास कामे राबवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्याचप्रमाणे आपण केलेल्या पाठपुराव्याची दखल विधान परिषद सदस्यांनी घेऊन या ठिकाणी निधी मंजूर केला. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांची आपण कृतज्ञता व्यक्त करतो असेच सहकार्य या भागाच्या विकासासाठी त्यांचे असेच सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक पाटील ,नितीन पाटील, राजाराम शिवाजी पाटिल, विजय कोडचवाडकर, टोपणा ना. पाटील, नारायण भगवंत पाटील, तानाजी पाटिल, कल्लापा घाडी, तालुका ग्रामपंचायत युनियनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी पाटील, राजश्री मादार, प्रगती गोंधळी, मयुरी ठाकर यासह गावातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.