IMG-20241119-WA0064


खानापूर : मराठा मंडळ संस्था संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर, हे बेळगाव जिल्ह्यातील एक नामांकित पदवीपूर्व महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयातील विद्यार्थिनी अभ्यास, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रस्थानी असतात. मराठा मंडळ संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू( हलगेकर) यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात.

नुकताच स. न. 2024 -25 या शैक्षणिक वर्षाच्या पदवीपूर्व विभागातील सांस्कृतिक स्पर्धा नंदगड येथे घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये येथील विद्यार्थिनींनी आपली चमक दाखविली आहे. इंग्रजी निबंध स्पर्धेत कुमारी समृद्धी पाटील हिने प्रथम येण्याचा मान मिळविला. तर कुमारी सुखदेवी महांतेश मादर या विद्यार्थिनीने कन्नड वाद विवाद चर्चा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच कुमारी मोहिनी पाटील हिने इंग्रजी वादविवाद चर्चा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. त्याचबरोबर कुमारी अमूल्या बाळेकुंद्री हिने एकपात्री अभिनय मोनो अॅक्टींग तृतीय क्रमांक, कुमारी साधना बळीराम दोडमणी हिने इंग्लिश पिक अँड स्पीच स्पर्धेत तृतीय क्रमांक कुमारी मेघा देसाई हिने ड्रॉईंग चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक, कुमारी श्रुती मारुती हुडेदार हिने भावगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक, कुमारी. सुनीता गुंडू नाईक जानपद गीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक, मिळविला
या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळविले असून सांस्कृतिक स्पर्धेत सुद्धा उज्वल यश संपादन केल्यामुळे मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू (हलगेकर) व ज्येष्ठ संचालक श्री परशराम आर. गुरव, संचालक श्री शिवाजीराव एस. पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे. सदर विद्यार्थिनींना कॉलेजचे प्राचार्य श्री अरविंद पाटील, व ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री राहुल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले असून जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सांस्कृतिक कमिटी चेअरमन प्रा. एन एम सनदी, सांस्कृतिक कमिटी सदस्य प्रा. आय सी सावंत प्रा मनीषा एलजी व सर्व प्राध्यापक वर्ग हे विशेष मेहनत घेत आहेत.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us